Tarun Bharat

संघाच्या पथसंचलनाला अनुमती

मद्रास उच्च न्यायालयात सुनावणी ः अधिकाऱयांच्या विरोधात अवमानाची याचिका

वृत्तसंस्था  / चेन्नई

तामिळनाडूतील मद्रास उच्च न्यायालयाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 6 नोव्हेंबर रोजी राज्यात पथसंचलन करण्याची अनुमती दिली आहे. न्यायालयाने तामिळनाडू पोलिसांना यासंबंधी निर्देश जारी केले आहेत. यापूर्वी संघ राज्यात 2 ऑक्टोबर रोजी पथसंचलन आयोजित करणार होता. परंतु, राज्य सरकारने अनुमती नाकारली होती.

याप्रकरणी संघाने उच्च न्यायालयात गृहसचिवांसह राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱयांच्या विरोधात अवमानाची याचिका दाखल केली होती. संघाचे तिरूवल्लूरमधील पदाधिकारी आर. कार्तिकेयन यांनी ही याचिका दाखल केली होती.

मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जी. के. इलांथिरैयन यांनी याचिकेवर सुनावणी करत पथसंचलनाला अनुमतीचा निर्णय दिला आहे. संघाला 6 नोव्हेंबर रोजी पथसंचलन करण्याची अनुमती पोलिसांनी द्यावी. या आदेशाचे उल्लंघन करणाऱया अधिकाऱयांना अवमानाच्या कारवाईला तोंड द्यावे लागणार असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Related Stories

माझे इंग्रजी उत्तम नाही!

Patil_p

पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ कायम, मुंबईत शंभरी पार, नवे दर काय?

Tousif Mujawar

सीमेवर दोन ड्रोन पाडविण्यात यश

Patil_p

हेमंत सोरेन यांना ‘दिलासा’ नाहीच

Patil_p

स्फोटाचे कारस्थान ‘जैश उल हिंद’चे

Patil_p

दिल्ली-एनसीआर भूकंपाने हादरले

Patil_p