Tarun Bharat

अलमट्टी धरण 95 टक्के भरले, 72 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु, कोल्हापूर जिल्ह्यात 58 बंधारे पाण्याखाली

Almatti Dam : कोल्हापूर जिल्ह्यात सुरु असलेल्या दमदार पावसाने पंचगंगा नदी पुन्हा एकदा पात्राबाहेर पडली आहे. आज 4 वाजेपर्यं राजाराम बंधारा पाणी पातळी 33 फूट 2 इंच इतकी आहे. तर पंचगंगा नदी इशारा पातळी 39 फूट व धोका पातळी 43 फूट आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत 58 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दुसरीकडे दुधगंगा धरणाचे सांडव्यावरील ५ वक्राकार दरवाजे उघडले असून त्यातून 423 क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे. तसेच पाॅवर हाऊसमधून 1 हजार क्युसेक्स असा एकूण 1 हजार 423 क्युसेक्सने विसर्ग सुरु आहे. याबाबत पाटबंधारे विभागाने माहिती दिली आहे. गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने आज धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढवण्यात आला आहे.

दरम्यान अलमट्टी धरणातूनही आज सकाळपासून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. सध्या अलमट्टी धरणात 95 टक्के पाणीसाठा झाल्याने 72 हजार क्युसेक्सने विसर्ग सुरु करण्यात आला आहे. यापूर्वी 6 हजार क्युसेक्सने विसर्ग सुरु होता. अलमट्टी धरणाची पाणी क्षमता 123.01 टीएमसी आहे. आतापर्यंत 117.376 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणामध्ये सध्या 37 हजार 41 क्युसेस पाण्याची आवक होत आहे, तर 72 हजार क्युसेक्सने विसर्ग केला जात आहे.

Related Stories

छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीग्रंथ राज्य सरकारच्या नजरकैदेत

Archana Banage

”पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय”

Archana Banage

कोल्हापूर : शाहुवाडीतील कंटेन्मेंट झोन अखेर मागे

Archana Banage

महाराष्ट्र : लॉकडाऊनबाबत नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Tousif Mujawar

पंतप्रधानांच्या समोरच अजित पवारांनी राज्यपालांना फटकारले

Archana Banage

कर्नाटक: इंदिरा कॅन्टीनमार्फत २४ मे पर्यंत मोफत भोजन

Archana Banage