Tarun Bharat

खरीप हंगामासाठी शेतकऱयांतून लगबग

Advertisements

पावसामुळे शेतकऱयांना मिळाला बऱयापैकी दिलासा

वार्ताहर /किणये

गुरुवारपासून बेळगावात मान्सूनला सुरुवात झाली आहे. यामुळे बळीराजा सुखावला आहे. या पावसाच्या आगमनामुळे शेत शिवारामध्ये खरीप हंगामाची लगबग सुरू असल्याचे शुक्रवारी तालुक्मयात दिसून आले.

पावसाने ओढ दिल्यामुळे यंदाचा खरीप हंगाम साधावयाचा कसा, याची चिंता शेतकऱयांना लागून राहिली होती. काही शिवारामध्ये धूळवाफ पेरणी करण्यात आली होती. पावसाअभावी उगवून आलेली भातपिके सुकून जात होती. अशा परिस्थितीत गुरुवारी दुपारपासून पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारी सकाळीही तालुक्यात दमदार पाऊस झाला. यामुळे शेतकऱयांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.

खरीप हंगाम साधण्यासाठी लगबग

काही ठिकाणच्या शिवारामध्ये भात पेरणी करण्यात येत होती. जमिनीत ओलावा निर्माण झाल्यामुळे शेतकरी बैलजोडीच्या साहाय्याने नांगरण करीत होते. तालुक्मयाच्या पश्चिम भागात रताळी पीक मोठय़ा प्रमाणात घेण्यात येते. गतवषी रताळय़ाला चांगला दर मिळाला होता. यामुळे यंदा मात्र या भागात रताळय़ाचे बांध (मेरा) मोठय़ा प्रमाणात ट्रक्टरच्या साहाय्याने ओढण्यात आल्या आहेत.

 शेतकऱयांनी एप्रिल महिन्यातच रताळी लागवड करण्यासाठी वेल लागवड केली आहे. बेळगुंदी, कुदेमनी, यळेबैल, सोनोली, राकसकोप, बेळवट्टी परिसरात लागवडीसाठी रताळी वेल तयार झाली असून शेतकऱयांनी शुक्रवारपासून रताळी लागवड करण्यास सुरुवात केली आहे. नावगे, मच्छे, पिरनवाडी, मजगाव भागात धूळवाफ पेरणी अधिक प्रमाणात करण्यात आली आहे. भाताची उगवण बऱयापैकी झाली असून भातपिकासाठी दोन दिवस झालेला पाऊस पोषक ठरणार आहे, असे शेतकऱयांनी सांगितले.

हंगाम साधण्यास गती येणार

जानेवाडी, कर्ले, बिजगर्णी, किणये, वाघवडे आदी भागात भातरोप लागवड मोठय़ा प्रमाणात करण्यात येते. त्यामुळे काही शेतकरी भात लागवडीसाठी भाताची पेरणी करू लागले आहेत. तालुक्मयात सर्व ठिकाणी पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोक्मयात आलेली आहेत. शेत शिवारामध्ये शेणखत घालणे, नांगरणी करणे आणि शिवारातील गवत काढणे आदी कामे झालेली आहेत. गुरुवारी व शुक्रवारी झालेल्या पावसामुळे खरीप हंगामाच्या कामाला गती येणार आहे.

रताळी वेल लागवडीला प्रारंभ

बटाटा लागवडीचे क्षेत्र घटले : दमदार पावसाची अपेक्षा

मागील दोन दिवसांपासून पावसाला प्रारंभ झाल्याने रताळी वेल लागवड आणि बटाटा लागवडीला सुरुवात झाली आहे. खरीप हंगामातील पेरण्या पावसाअभावी लांबणीवर पडल्या होत्या. आता अधूनमधून पावसाला सुरुवात झाल्याने पुन्हा पेरणीची कामे हाती घेण्यात आली आहेत. भात पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. भुईमुग, सोयाबीन आणि इतर पेरणी सुरू झाली
आहे.

यंदा बेळगाव आणि खानापूर तालुक्मयातील काही भागात रताळी वेल लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. अलीकडच्या काही वर्षात बटाटा पिकाला भाव मिळाला नाही, शिवाय उत्पादनही म्हणावे तसे झाले नाही. त्यामुळे शेतकऱयांचा ओढा रताळी वेल लागवडीकडे वाढला आहे. पडिक आणि लाल जमिनीत रताळय़ाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे तालुक्यातील पश्चिम भागात माळरानावर रताळी वेल लागवड करताना शेतकरी दिसत आहेत.

खरीप हंगामातील पेरण्या पावसाअभावी लांबणीवर पडल्या होत्या. आता पावसाला प्रारंभ झाल्याने पेरणी कामाला सुरुवात झाली आहे. भात, भुईमूग, बटाटा, सोयाबीन, रताळी वेल आणि इतर पेरणी कामे सुरू आहेत. त्याबरोबर उत्तर भागातही बटाटा, रताळी आणि सोयाबीन पेरणीसाठी शेतकऱयांची धांदल उडत आहे. अलीकडे तालुक्मयातील बटाटा लागवडीचे क्षेत्र कमी होत असून त्या जागी रताळी वेल लागवडीला पसंती दिली जात आहे. पेरणी झालेल्या पिकांसाठी दमदार पावसाची गरज असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱयांतून व्यक्त होत आहेत.

Related Stories

जिल्हय़ात बुधवारी केवळ 1 रुग्ण

Amit Kulkarni

गरज नव्या पार्किंग-नो पार्किंग झोनची

Patil_p

कर्नाटक: केकेजीएसएस देशातील राष्ट्रीय ध्वज निर्मितीचे एकमेव अधिकृत केंद्र

Abhijeet Shinde

विधानसभेत आर. एल. जालाप्पा यांना श्रद्धांजली

Amit Kulkarni

स्मार्ट सिटीमधील रस्ते बनले चिखलमय

Amit Kulkarni

रामदुर्ग तालुक्यात गुरुवारी 12 पॉझिटिव्ह

Patil_p
error: Content is protected !!