प्रतिनिधी / बेळगाव :
गणेशोत्सवाच्या पार्श्ववभूमीवर राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोककुमार हे बेळगावला दाखल झाले आहेत. त्यांनी मंगळवारी सकाळी चव्हाट गल्ली, खडक गल्ली, गणपत गल्ली यासह इतर परिसरात भेट दिली. यावेळी त्यांनी अधिकार्यांबरोबर चर्चा करुन बंदोबस्त ठेवण्याबाबत सूचना केली आहे.
हे हि वाचा | https://tarunbharat.com/police-force-ready-for-ganeshotsav-arrangements/
बेळगावचा गणेशोत्सव हा सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जातो. बेळगावची मिरवणूक देखील भव्य असते. त्यामुळे त्या काळात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवणे महlवाचे असते. त्या पार्श्वभूमीवर अलोककुमार हे बेळगावला आले आहेत. त्यांनी विविध भागाला भेट देवून पाहणी केली आहे. कोणत्याही प्रकारे अनुचित घटना घडू नयेत याकडे लक्ष देण्याबाबत त्यांनी सूचना केली आहे. यावेळी त्यांच्या सोबत पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंग³या, उपायुक्त रविंद्र गडादी, एसीपी एन. व्ही. बरमनी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
हे हि वाचा | https://tarunbharat.com/ganesh-festival-khanapur/