तरुणभारत ऑनलाइन
दिवाळीचं अभ्यंगस्नान आणि सुगंधित उटणे हे तर ठरलेलंच समीकरण आहे.पण बऱ्याच महिला त्वचा तेजस्वी ठेवण्यासाठी नेहमी उटण्याचा वापर करतात.उटणं हे एक उत्तमप्रकारचे स्क्रबर आहे. बाजारातून विकतची स्क्रबर्स लावण्यापेक्षा उटण्यामुळे बराच फायदा होतो. त्वचेच्या समस्या दूर करण्यासह तुमच्या त्वचेचं आरोग्य आणि तुमचे सौंदर्य जपण्यासाठी याचा खूपच फायदा होतो. जाणून घेऊयात उठण्याचे खास फायदे.
उटण्यामधील आयुर्वेदिक घटकांमुळे संसर्ग कमी होते. सूर्यप्रकाशामुळे झालेले त्वचेचे नुकसान टाळण्यास मदत होते. आठवड्यातून एकदा उटण्याचा वापर केल्याने त्वचा निरोगी राहते.
उटणं हे एका स्क्रबरप्रमाणे काम करत असल्याने टॅनमुळे काळवंडलेली त्वचा उजळण्यास आणि त्वचेवर साचलेला डेड स्किनचा स्तर कमी करण्यास मदत करते.
चेहऱ्यावरील केसांची वाढ कमी करण्यासाठी अनेक स्त्रिया उटण्याची निवड करतात. उटण्याची पेस्ट चेहऱ्यावर गोलाकार दिशेने फिरवल्यास मुळापासून त्याची वाढ रोखण्यास मदत होते. महिनाभर हा प्रयोग केल्यास त्याचे परिणाम अधिक स्पष्टपणे दिसून येतात.
त्वचेवर सुरकुत्या देखील उटणं लावल्याने कमी होण्यास मदत होते. उटण्यामध्ये अॅन्टी एजिंग, अॅन्टी ऑक्सिडेंंटिव्ह आणि दाहशामक क्षमता असते. यामुळे सुरकुत्या कमी करण्यास मदत होते. यामध्ये मध मिसळल्यास त्वचा मुलायम राहते आणि नेहमीसाठी आरोग्यदायीही राहते.