अथर्व बेनके सामनावीर, मलिक मुल्ला मालिकावीर
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
एमसीसीसी अकादमी आयोजित अल्फा चषक 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात युनियन जिमखाना संघाने एमसीसीसी अकादमी संघाचा 26 धावांनी पराभव करुन अल्फा चषक पटकाविला. अथर्व बेनके याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. तर मलिक रेहान मुल्ला याला मालिकावीराने गौरविण्यात आले.
फिनिक्स स्कूलच्या मैदानावरती आयोजित करण्यात आलेल्या अल्फा चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात युनियन जिमखानाने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 9 गडी बाद 201 धावा केल्या. त्यात अथर्व बेनकेने 7 चौकारांसह 54, प्रितम उळाग•ाrने 2 षटकार 6 चौकारांसह 43 तर बसवराज माळगीने 24 धावा केल्या. एमसीसीसीतर्फे मलिक मुल्लाने 24 धावात 4 तर आर्सलीन जमादार व हर्ष कित्तुर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना एमसीसीसी संघाने 25 षटकात 7 गडी बाद 175 धावाच केल्या. त्यात मलिक मुल्लाने 30 तर हर्ष कित्तुर, सॅमसंग ढवळे यांनी प्रत्येकी 21 धावा केल्या. जिमखानातर्फे स्वयम वाडेबैलकरने 2 तर अर्झान व सिद्धांत यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे फरान शेख, युसूफ पठाण, महांतेश गवी, नियाज इनामदार, गौस हाझी यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघाला चषक व पदके देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर व उत्कृष्ट फलंदाज अथर्व बेनके, उत्कृष्ट गोलंदाज हर्ष कित्तुर तर मालिकावीर मलिक रेहान मुल्ला यांना चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून सुनिल देसाई, चंद्रशेखर पूरद, महांतेश गवी, नियाज इनामदार, गौस हाझी यांनी काम पाहिले.