नवी दिल्ली
मोबाईल क्षेत्रात नाव कमावणारी कंपनी शाओमी कॉर्पोरेशनच्या भारतीय प्रमुखपदी अल्वीन त्से यांची निवड करण्यात आली आहे. त्से हे यापूर्वी इंडोनेशियातील व्यवसायाची धुरा कार्यकारी म्हणून पाहात होते. भारतात ते आता मुख्य किंवा सहाय्यक व्यवस्थापक म्हणून काम पाहणार आहेत. भारताच्यावतीने मध्यंतरी शाओमीवर कारवाई करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर ही नवी निवड झाली आहे.