वार्ताहर /उचगाव
तुरमुरी येथील तुरमुरी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा शिवजयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शिवजयंती दिवशी पार पडला. या क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना तुरमुरी ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष नागनाथ जाधव यांच्या उपस्थितीत आळवंत स्पोर्ट्स क्लब विरुद्ध मोरया स्पोर्ट्स क्लब यांच्यामध्ये नाणेफेक करून खेळविण्यात आला. नाणेफेक मोरया संघाने जिंकली आणि क्षेत्ररक्षण घेतले. आळवंत स्पोर्ट्स क्लब आपल्या तडाखेबाज फलंदाजीच्या जोरावर दहा षटकात चार बाद 93 धावा जमविल्या. प्रत्युत्तरादाखल मोरया संघाने आठ बाद 82 धावावर संघ थांबला. अशारीतीने 12 धावांनी आळवंत स्पोर्ट्स क्लब तुरमुरी प्रीमियर लीग 2023 सीजन पहिले या चषकाचा मानकरी ठरला. तीन विकेट घेणारा प्रभाकर बेळगावकर सामनावीर ठरला. विजयी संघाला व खेळाडूंना बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मीताई हेब्बाळकर यांच्या हस्ते व प्रमुख पाहुणे मृणाल हेब्बाळकर, तुरमुरी प्रीमियर लीगचे अध्यक्ष ग्रामपंचायत माजी अध्यक्ष नागनाथ जाधव व प्रमुख पाहुणे अडत व्यापारी राजू खेमाना जाधव, ग्रा.पं. अध्यक्षा वैशाली रघुनाथ खांडेकर, उपाध्यक्ष चांगदेव मारुती बेळगावकर, सदस्य सुरेश राजूकर, सदस्य मारुती यल्लाप्पा खांडेकर, इराप्पा खांडेकर, परशराम खांडेकर, ज्योतिबा जाधव, महेंद्र जाधव, रघुनाथ खांडेकर, बाळू अष्टेकर, मारुती खांडेकर, यल्लाप्पा मेगोचे, विजय खांडेकर यांच्या हस्ते विजयी संघांना पारितोषिक वितरित केले. यामध्ये आळवंत स्पोर्ट्स क्लब, मोरया स्पोर्ट्स क्लब ,गणेश स्पोर्ट्स क्लब, चव्हाटा स्पोर्ट्स क्लब, रामलिंग स्पोर्ट्स क्लब, जय हनुमान स्पोर्ट्स, ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स, श्रीराम स्पोर्ट्स या संघांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. बेस्ट बॅट्समन म्हणून ज्ञानेश्वर काकतकर, बेस्ट बॉलर म्हणून शंकर भक्तीकर, सर्वोत्कृष्ट फलंदाज विवेक व सर्वोत्कृष्ट टुर्नामेंटची टीम, आदर्श टीम जय हनुमान स्पोर्ट्स यांनाही पारितोषिके देऊन गौरविले. सूत्रसंचालन पुंडलिक खांडेकर व सुनील बेळगुळकर यांनी केले. पंच म्हणून लक्ष्मण कांबळे व दिनेश यांनी काम पाहिले.