Tarun Bharat

मांद्रेतील जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध!

आमदार जीत आरोलकर : भाऊसाहेबांचा शैक्षणिक वसा पुढे चालू ठेवण्यासाठी प्रयत्नशील

चंद्रहास दाभोलकर /हरमल

मांदे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व म्हणजे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या स्वप्नातीत मतदारसंघ. भाऊसाहेबांनी शिक्षणाचा पाया घातला. त्यांच्या थोर व्यक्तिमत्वाची पुण्याई व वसा पुढे चालविण्यासाठी आपण मांदेत प्रयत्नशील आहे. गरीब व कमकुवत गटांतील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी आपले जीवन व्यतीत करण्याची आपली तयारी आहे. मांदे मतदारसंघातील विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा ज्यात मोफत वह्या, गणवेश, बॅग्स तसेच उच्च शिक्षणासाठी प्रवेश शुल्क भरण्यासाठी आपले व ‘उदरगत’ संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. कोविड काळात वायफाय सुविधा उदरगत संस्थेने प्राधान्याने उपलब्ध केली होती, असे जीत आरोलकर म्हणाले.

सरकारी शाळा इमारतीची स्थिती दयनीय बनली असून त्यांचे नूतनीकरण व अपग्रेड करण्यासाठी आपण शिक्षण खात्याकडे पाठपुरावा चालू आहे. शाळांची स्थिती उत्तम असल्यास, पालक आपल्या मुलांचा या शाळेत प्रवेश घेऊ शकतो. त्याकडे आपले विशेष लक्ष देत असल्याचे सांगितले.

बेरोजगारी दूर करणे हे उद्दिष्ट !

निवडणुकीत प्रमुख आश्वासन म्हणजे बेरोजगार युवकांना रोजगार संधी. प्रत्येक घरांत नोकरी ही संकल्पना राबवताना रोजगाराभिमुख व इको प्रेंडली प्रकल्प उभारणे काळाची गरज आहे. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी मांदे मतदारसंघातील आवश्यक पात्रता असलेल्या 20-22 युवक-युवतींना नेमणूक पत्रे दिली आहेत तर काहींना प्रशिक्षणासाठी बेंगळूरूला पाठवण्यात येईल. तुये इलेक्ट्रॉनिक सिटी, आयुष इस्पितळ, क्रिकेट स्टेडियम आदी अनेक प्रकल्प पूर्णत्वास येणार असून रोजगाराच्या संधी स्थानिकांना देण्याचा प्रयत्न आहे. जुनसवाडा येथे 1 लाख 60 हजार चौ. मी. जागेत इको प्रेंडली प्रकल्पाच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री डॉ. सावंत तसेच पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनी होकार दिला आहे. येत्या 2 वर्षांत तुये इलेक्ट्रॉनिक सिटीमध्ये दोन रोजगाराभिमुख प्रकल्प साकार होणार असून त्या उद्योगात किमान हजारभर युवकांना नोकऱया उपलब्ध होईल. जाहीरनाम्यातील 5 वर्षांत 10 हजार नोकऱया हे उद्दिष्ट निश्चितच पूर्ण होईल, असा विश्वास असल्याचे सांगितले.

वीज, पाणीपुरवठा प्रमुख समस्या, यश दृष्टीपथात

मांदेतील जनतेस वीज व पाणी ही प्रमुख समस्या दूर करण्यासाठी निवडून आल्यानंतरच्या तीन महिन्यात कमालीची प्रगती साधली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात वीज खात्यासाठी 250 कोटींची तरतूद असून त्यापैकी मांदेसाठी वीज क्षेत्रात 100 कोटींची अर्थसंकल्पात तरतूद केली आहे, ही जमेची बाजू आहे. वर्षभरात वीज सबस्टेशनचे काम पूर्ण होईल तसेच भूमिगत केबल्स सुविधांचा प्रश्न सुद्धा मार्गी लागला आहे. त्यामुळे जनतेला अखंडित वीजपुरवठा होईल, हे लक्षात घेतले पाहिजे.

पाणीपुरवठय़ासाठी खास योजना!

पाणी समस्या प्रत्येक मतदार अनुभवत आहे, हे मोठे दुःख आहे. पुरवठय़ाची सोय असली तरी पाणी उपलब्ध होणे गरजेचे असते. तिळारी प्रकल्पाची क्षमता असली तरी ते पाणी तुये प्रकल्पापर्यंत आणणे आवश्यक आहे. चांदेल येथे नवीन टाकी उभारणी चालू आहे, शिवाय सुकेकुळण येथेही टाकीचे काम चालू आहे.

त्यासाठी 30 व 15 एमएलडी प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. वैशिष्टय़ म्हणजे, मांदे मतदारसंघात किमान 4 तास पाणीपुरवठा होईल. यासाठी खास योजना तयार केली आहे. मांदे मतदारसंघात पाणी योजना कशी यशस्वीपणे राबविण्यासाठी तिळारी प्रकल्पासाठी योगदान दिलेले जलस्त्राsत खात्याचे निवृत्त मुख्य अभियंता संदीप नाडकर्णी यांची  खास सल्लागारपदी नियुक्ती केल्याचे सांगितले. सध्याचे प्रमुख अभियंता बदामी व निवृत्त अभियंता नाडकर्णी यांच्या सहकार्याने मांदेसाठी योग्य व पूरक निर्णय, जनतेच्या भल्यासाठी निश्चितच दृष्टीपथात आहे.

पोलीस स्थानक, अग्निशामक केंद्राची लवकरच उभारणी

मांदे मतदारसंघातील समुद्रकिनारे पाहता, सुसज्ज अशा पोलीस स्थानकाची गरज आहे. या किनाऱयाना भेटी देणाऱया पर्यटकांना सुरक्षितता नसल्याने अनेक गैर व अनैतिक घटना तसेच गुन्हेगारी वाढली आहे. त्यावर अंकुश ठेवण्याच्या दृष्टीने पोलीस दल सुसज्ज असणे क्रमप्राप्त ठरते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी चर्चेअंती पोलीस स्थानक व अग्निशामक केंद्र उभारण्याची मागणी मान्य केली असल्याची माहिती आमदार आरोलकर यांनी दिली.

किनारी भागात पर्यटन सुविधा अंतिम टप्प्यात !

हरमल समुद्रकिनारी होऊ घातलेला चेजिंग रुम, प्रसाधन कक्ष, स्वच्छ पाणी आदी प्रकल्पासाठी प्रशासकीय सोपस्कार अंतिम टप्प्यात आहेत, तसेच तेंब मोरजी, आश्वे या किनाऱयावर पावसाळय़ानंतर काम सुरू होईल, असे सांगितले. पालये ते केरी रस्त्यांचे काम पावसाळय़ानंतर सुरू होईल, त्यासाठी रस्त्याचे चढ-उतार कमी करून, रस्ता निर्धोक बनणार आहे. प्रत्येक पंचायत क्षेत्रातील अंतर्गत रस्त्याचे हॉट मिक्सिंग व डागडुजी पावसाळय़ानंतर हाती घेण्यात येईल, असा विश्वास आमदार आरोलकर यांनी व्यक्त केला आहे.

महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी कार्यरत

प्रत्येक गृहिणींना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करण्याचा मानस व संकल्प आहे. मांदे मतदारसंघातील महिला स्वाभिमानी असून आत्मनिर्भर बनल्या पाहिजे हा उद्देश आहे. त्या दृष्टीने मोरजी गावात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून फक्त महिलांच्या उन्नतीसाठी लवकरच लघु व सूक्ष्म उद्योग प्रकल्प सुरू करण्यात येईल व अलीकडेच एका स्वतंत्र बैठकीत अंतिम निर्णय घेतला आहे.

मांदे ’नंबर वन’साठी प्रयत्न

गेली कित्येक वर्षे मांदेतील जनता वीज, पाणी व बेरोजगारी या प्रश्नाबाबत गंभीर आहे. वीज व पाणी याबाबत यश मिळाल्याचे सध्यातरी वाटत आहे व आपण त्याचा पाठपुरावा चालूच ठेवला आहे. बेरोजगारी हा प्रश्न रोजगार मिळाल्यानंतर नष्ट होईल. त्यामुळे बेरोजगार युवकांना रोजगार मिळत नाही तोपर्यंत मांदे ‘नंबर वन’ करण्यासाठी प्रयत्न कमी पडतील याची जाणीव आपणांस आहे. मांदेतील संयमी व चाणाक्ष जनतेने चांगल्या पद्धतीने सहकार्य केल्याने आपण अनेक खात्यातील अधिकाऱयांना सोबत घेऊन मांदेसाठी आराखडा निश्चित केला आहे. स्वयंसेवी संस्था व भविष्यवेध जाणून असलेल्या सुजाण नागरिकांनी सूचना केल्यास त्याचा आदरभाव राखून आपण जनेसेवेसाठी नेहमीच कटिबद्ध असल्याचे आवर्जून सांगितले.

Related Stories

मराठी भाषा चळवळीची तोफ थंडावली रामनाथ ग. नाईक निवर्तले

Amit Kulkarni

कब्रस्तान जागेच्या झोन बदलामुळे मडगाव पालिकेसमोर निदर्शने

Amit Kulkarni

रियल इस्टेटसाठी ‘लॉकडाऊन’मधून थोडी शिथिलता द्यावी

Omkar B

प्रो. फुटबॉल स्पर्धेत सेसा अकादमीचा यूथ मानोरावर 5-3 असा विजय

Amit Kulkarni

शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थानच्या जत्रोत्सवाची सांगता

Patil_p

मजूर निधी घोटाळाप्रकरणी लोकायुक्तचा सरकारला दणका

Omkar B