क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेंगळूर येथे झालेल्या दुसऱया कर्नाटक राज्य मिनी ऑलिम्पिक जलतरण स्पर्धेत बेळगावचा ऍक्वेरिअस व स्विमर्स क्लबचा खेळाडू अमन सुगूरने 3 रौप्य व 2 कांस्य पदके पटकाली.
बसवनगुडी बेंगळूर येथे झालेल्या मिनी ऑलिम्पिक जलतरण स्पर्धेत संपूर्ण कर्नाटकातून 700 हून अधिक जलतरणपटूंनी भाग घेतला होता. त्यात अमन सुगूरने 50 मीटर बॅकस्ट्रोक 50 मीटर बटरफ्लाय, 100 मीटर बॅकस्ट्रोक या प्रकारांत रौप्य, 200 मीटर बॅकस्ट्रोक व 200 मीटर वैयक्तिक मिडले यामध्ये 2 कांस्यपदके पटकाविली.
अमन हा रोटरी-मनपा व जेएनएमसीच्या जलतरण तलावात सराव करत असून त्याला उमेश कलघटगी, अक्षय शेरेगार, अजिंक्मय मेंडके, नितेश कुडुचकर, गोवर्धन काकतकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.