क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
केरळ येथील तिरुवनंतपुरम येथे साऊथ झोन राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत दुसऱ्या दिवशी कर्नाटक बेळगावचा जलतरणपटू अमन सुणगार याने 200 मी. बॅकस्ट्रोक प्रकारात सुवर्णपदकासह नवा स्पर्धाविक्रम नोंदवला. पहिल्या दिवशी 4×100 मिडले रिलेमध्येही नवा स्पर्धाविक्रम नोंदवला होता.
साऊथ झोन राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या स्वीमर्स व अॅक्वेरियस क्लबचा जलतरणपटू अमन सुणगार याने 200 मी. बॅकस्ट्रोक स्पर्धेत नवीन विक्रम नोंदवत सुवर्णपदक पटकावले. यापूर्वी या स्पर्धेचा विक्रम 2.17.80 हा होता. हा विक्रम मोडत अमनने 2.18.57 इतका वेळ घेत नवा विक्रम नोंदवला आहे. अमनने सलग दुसऱ्या दिवशी कर्नाटकाला दुसरे सुवर्णपदक मिळवून देत विक्रमही स्थापित केला आहे.