बेळगाव; उत्तर मतदारसंघातील म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार अॅड. अमर येळ्ळूरकर यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी सकाळी कॅम्प परिसरात प्रचारफेरी काढण्यात आली. येथील उभा मारुती मंदिरात दर्शन घेऊन प्रचारास प्रारंभ करण्यात आला. कॅम्प परिसरात सर्व जाती-धर्माचे नागरिक राहत असतात. सर्व जाती-धर्माच्या समाजाशी जुळवून कार्यरत असल्याने अमर येळ्ळूरकर यांना उत्स्फूर्त पाठिंबा व्यक्त करण्यात आला. सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जोरदार रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक परिसरातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवार करीत आहेत. म. ए. समितीचे उमेदवार अमर येळ्ळूरकर यांनी विविध भागातील नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. त्याचप्रमाणे शुक्रवारी सकाळी कॅम्प परिसरात प्रचारफेरी काढून म. ए. समितीला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. कॅम्प परिसर सर्वसमावेशक मतदारांचा भाग म्हणून ओळखला जातो. सर्व समाज एकोप्याने कार्यरत असतात. या ठिकाणी म. ए. समितीच्या उमेदवाराला कायम पाठिंबा असतो. त्यामुळे अमर येळ्ळूरकर यांनी या परिसरातील नागरिकांचा आशीर्वाद घेतला. याप्रसंगी नागरिकांशी चर्चा करून म. ए. समितीला मतदान करण्याची विनंती केली. प्रचारफेरीत परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.
Previous Articleकाकतीवेस परिसरात राजू सेठ यांचा प्रचार
Next Article कणकुंबी भागात भाजपचा झंझावात
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.