Tarun Bharat

अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा कट उधळला; 150 मीटरचे भुयार BSF कडून उद्ध्वस्त

Advertisements

ऑनलाईन टीम / श्रीनगर :  

जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात (Samba, Jammu & Kashmir)आंतराराष्ट्रीय सीमेला लागून दहशतवाद्यांनी खोदलेले 150 मीटरचे भुयार (150 m long tunnel)आढळून आले आहे. या भुयाराद्वारे भारतात घुसखोरी करुन अमरनाथ यात्रा उधळून लावण्याच्या प्रयत्नात दहशतवादी होते. त्यांचा हा डाव बीएसएफच्या जवानांनी उधळून लावला आहे.    

बीएसएफचे उपमहानिरीक्षक एस. पी. एस. संधू (SPS Sandhu) म्हणाले, बुधवारी सायंकाळी सीमा सुरक्षा दलाकडून सांबा सेक्टरच्या परिसरात नियमित तपासणी सुरू होती. यावेळी चक फकिरा चौकीजवळ पाकिस्तानच्या बाजूने भुयार खोदल्याची माहिती मिळाली. या भुयाराचे तोंड अशाप्रकारे झाकण्यात आले होते की, ते भुयार सहजपणे ओळखता येत नव्हते. पाकिस्तानच्या बाजूने हे 150 मीटरचे भुयार खोदण्यात आले होते. पाकिस्तानी सीमेतील चमन खुर्द फियाजच्या पाकिस्तानी लष्कराच्या चौकीपासून हे भुयार सुरू होते. त्याचा शेवट भारतीय हद्दीत होतो. विशेष म्हणजे या भुयारात ऑक्सिजनचे पाईपही सोडण्यात आले होते. हे पाईप 265 फूट लांब होते. भुयार ओलांडताना श्वास घेण्यास त्रास होऊ नये म्हणून दहशतवाद्यांनी तजवीज केली होती. पाकिस्तानी लष्कराच्या देखरेखीखाली हे भुयार खोदण्यात आल्याची माहिती आहे. या भुयारातून वाळूने भरलेली 21 पोतीही बीएसएफने जप्त केली आहेत.

Related Stories

नवरात्रोत्सवानिमित्त राज्यात महिला आरोग्यासाठी विशेष अभियान; मुख्यमंत्र्यांकडून महत्वाची घोषणा

Archana Banage

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया सुरू

datta jadhav

देशात 54,736 नवे कोरोना रुग्ण, एकूण संख्या 17.5 लाखांवर

datta jadhav

प्रदीप शर्मा यांच्या अडचणींमध्ये वाढ; 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत

Tousif Mujawar

प्रारुपानुसारच राम मंदिराची उभारणी

Patil_p

तामिळनाडूचे कृषीमंत्री आर. दोराईकन्नू यांचे कोरोनाने निधन

datta jadhav
error: Content is protected !!