Tarun Bharat

अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी, १० भाविकांचा मृत्यू

ऑनलाईन टीम/ तरुण भारत

जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) बाबा अमरनाथ गुहेजवळ संध्याकाळी  (Baba Amarnath Cave) ढगफुटी झाली आहे. ढगफुटीमुळे याठिकाणी मोठी दुर्घटना घडली आहे. अमरनाथ गुंफेजवळ संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास झालेल्या ढगफुटीत १० यात्रेकरुंचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. रेस्क्यू ऑपरेशनसाठी एनडीआरएफ (NDRF)ची टीम घटनास्थळी पोहचली असून एसडीआरपी (SDRF)च्या मदतीने रेस्क्यु ऑपरेशन सुरू आहे. तर मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

ढगफुटीनंतर अमरनाथ गुफा परिसरात (Amarnath Cloud Burst ) असलेल्या अनेक कॅम्प परिसरातून पाणी वेगाने वाहत आहे. ही घटना संध्याकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफकडून (NDRF) ही माहिती देण्यात आली आहे.

एनडीआरएफचे डीजी अतुल करवाल यांनी सांगितले की, अमरनाथ गुहेजवळील ढगफुटीत आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. ३ जणांना वाचवण्यात यश आले आहे. एनडीआरएफची अनेक पथके घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत.’ त्यांनी पुढे सांगितले की, ‘अमरनाथ गुहेजवळ एनडीआरएफची एक टीम नेहमीच तैनात असते. जेणेकरून अशा घटना घडल्यानंतर तात्काळ मदत करता यावी.’

हे ही वाचा : ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत- नाना पटोले

ढगफुटीमुळे अमरनाथ गुंफेजवळ यात्रेकरुंसाठी उभारण्यात आलेले तंबू आणि लंगर पाण्यात वाहून गेले आहेत. तर यात्रेकरुंना एअर लिफ्ट करून सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाने थैमान सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून अमरनाथ येथेही पावसाचा जोर वाढल्याने यात्रा थांबवण्यात आली होती. यामुळे सगळे यात्रेकरु तंबू आणि छावण्यांमध्येच थांबले होते. मात्र संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक ढगफुटी झाली आणि मुसळधार पावसाच्या पाण्यात तंबूच वाहून गेले. तर काही ठिकाणी तंबूत पाणी शिरले. यामुळे भयभीत झालेले भाविक सैरावैरा धावू लागले. मात्र तेथे तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ एनडीआएफ आणि एसडीआरएफ तसेच ITBP यांना संपर्क साधून पाचारण केले. त्यानंतर यात्रेकरूंना एअर लिफ्ट करुन सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

Related Stories

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरण: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई दिल्ली पोलिसांच्या ताब्यात

Archana Banage

रोज फक्त पाच हजार भाविकांनांच मिळणार तुळजाभवानीचे दर्शन

Archana Banage

पिकअपच्या धडकेत एकजण ठार

Abhijeet Khandekar

एअर इंडियाच्या विमानातून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा प्रवास, अन्य प्रवाशी 14 दिवसांसाठी क्वारंटाईन

Tousif Mujawar

कृषी कायदे माघार विधेयक संमत

Patil_p

जेईई मेन, ‘नीट’ परीक्षा आता सप्टेंबरमध्ये होणार

Patil_p