नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राष्ट्रीय कंपनी कायदा अपील लवादाने ऍमेझॉन कंपनीची याचिका फेटाळल्यामुळे या कंपनीला करण्यात आलेल्या दंडाची 200 कोटी रुपयांची रक्कम भरावी लागणार आहे. हा निर्णय न्या. एम. वेणुगोपाल आणि न्या. अशोक कुमार मिश्रा यांनी घोषित केला. याप्रकरणी काँपिटिशन कमिशन ऑफ इंडिया (सीसीआय) या संस्थेने दिलेला निर्णय अपील लवादाने उचलून धरला. ऍमेझॉन कंपनीने सीसीआयच्या निर्णयाविरोधात अपील लवादासमोर दाद मागितली होती. ऍमेझॉन कंपनीने माहिती लपविल्याचा आरोप करण्यात आला होता.