Tarun Bharat

अंबाबाई दर्शनाला उच्चांकी ८ लाख भाविक

मंदिर परिसरात गर्दीचा महापूर : मुख्यदर्शन रांग भर उन्हात शिवाजी चौकापर्यंत, मुखदर्शन रांगेनेही घातला मंदिराला वळसा

Advertisements

प्रतिनिधी/कोल्हापूर

शारदीय नवरात्रोत्सवाच्या इतिहासात कधीच झाली नाही इतकी उच्चांकी गर्दी रविवारी करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी झाली. सुट्टीचे औचित्य साधुन कोल्हापूरात आलेल्या तब्बल ८ लाख भाविकांनी दिवसभरात अंबाबाईचे दर्शन घेतले. पहाटे चार वाजल्यापासूनच स्थानिकांसोबत परगावचे भाविक मंदिराच्या पूर्व दरवाजाजवळील दर्शन रांगेत दाखल होत होते. दुपारी एकनंतरच्या भरउन्हात दर्शन रांग जुना राजवाडय़ाच्या नगारखान्यातून भाऊसिंग रोडवर आणि तिथून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतही गेली. ही रांग शिवाजी चौकातून मागे वळून गुजरी कॉर्नरपर्यंत आली होती.

अंबाबाईच्या मुखदर्शनासाठीही गर्दी उसळली होती. दुपारच्या सुमारास मुखदर्शन रांगेने चक्क मंदिरालाच वळसा घातला होता. मंदिराच्या पूर्व दरवाजापासून सुरु झालेल्या दर्शन रांगेसह मंदिरातील मुखदर्शन रांगेला शिस्त लावण्यासाठी ऍनिरुद्धास् ऍपॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचे 425 कार्यकर्ते भर उन्हात तैनात होते. नवरात्री उत्सवाच्या पहिल्या माळेपासूनच गर्दीचा उच्चांक मोडला जाईल, इतक्या मोठय़ा संख्येने संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक व गोव्यातील भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी येऊ लागले आहेत. दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त नवरात्रोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे सहाजिकच भाविकांमध्ये कमालीचा उत्साह आहे.

हे ही वाचा : स्वच्छतेत कोल्हापूर घसरले, देशात १०४ नंबर

दर्शनानंतर बहुसंख्य भाविक मंदिर परिसरातील दुकानांकडे खरेदीसाठी वळले. साडी, इमिटेशन ज्वेलरी, पर्स, कपडे, गुळ, कोल्हापूरी चप्पलसह गृहपयोगी वस्तूंची मोठय़ा प्रमाणात खरेदी केली. सकाळी सहानंतर सांगली, सातारा, रत्नागिरी, सोलापूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामती, नाशिक, मुंबई, ठाणे, औरंगाबाद, अहमदनगर, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, बेळगाव व गोवा येथील भाविक मोठय़ा संख्येने अंबाबाई मंदिराच्या दिशेने दाखल होऊ लागले. 14 ठिकाणच्या वाहनतळांवर वाहने लावल्यानंतर भाविकांचा लोट थेट मंदिराच्या पूर्व दरवाजाजवळील दर्शन रांगेत दाखल होत होता.

सायंकाळी पाचनंतर थोडा गर्दीचा ओघ कमी झाला. मात्र रात्री आठनंतर पुन्हा अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी वाढली. त्यामुळे मुख्यदर्शन रांग भाविकांनी भरून गेलीच, शिवाय मंदिरातील मुखदर्शन रांगही भाविकांनी तुडूंब भरून गेली. त्यामुळे मंदिराचा पालखी प्रदक्षिणा मार्ग भाविकानी खचाखच भरून गेला होता.

Related Stories

Kolhapur; स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काळम्मावाडी धरणावर विद्युत रोषणाई

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : जिल्हय़ात 11 बळी, 620 पॉझिटिव्ह

Archana Banage

‘शिष्यवृत्तीच्या रक्कमेत वाढ करणार’

Archana Banage

एकरकमी एफआरपीसह १४ टक्के वाढ घेणारच

Archana Banage

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यी वसतिगृहाला छ.शाहू महाराजांचे नाव देण्याची मागणी

Abhijeet Khandekar

महाविकास आघाडी हे संभ्रमाचे सरकार : चंद्रकांतदादा पाटील

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!