Tarun Bharat

Kolhapur : अंबाबाई दर्शन पेडपास प्रकरण न्यायालयात

ज्येष्ठ पुजारी मुनीश्वरांच्या दाव्यावर आज सुनावणी

Advertisements

कोल्हापूर प्रतिनिधी

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून नवरात्री उत्सवात वितरित केल्या जाणाऱ्या पेड पासच्या विरोधात ज्येष्ठ पुजारी गजानन मुनीश्वर यांनी गुरुवारी दिवाणी न्यायालयात धाव घेतली आहे. पाससंदर्भातील सुनावणी शुक्रवार 23 रोजी होणार आहे.

दोन दिवसांपूर्वी देवस्थान समितीने पेड ई पासऐवजी पेड पास देण्याचा निर्णय घेतला होता. उत्सव काळात रोज 1 हजार भाविकांना पेड पास दिला जाणार होता. पाससाठी किती रक्कम आकारली जाईल, हेही लवकरच जाहीर केले जाणार होते. तत्पूर्वी पेड पासच्या विरोधात न्यायालयात जावू असाही इशारा अंबाबाईचे ज्येष्ठ पुजारी गजानन मुनीश्वर यांनी दिला होता. दरम्यान, समितीने पेड पास वितरण करण्याचा निर्णय घेऊन आम्हालाच आव्हान देण्याचे काम केले आहे. त्यामुळे नाईलाजात्सव दिवाणी न्यायालयाकडे धाव घ्यावी लागली असल्याचे गुरुवारी मुनीश्वर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे कळवले आहे.

निवेदनात म्हटले आहे, 2009 सालापुर्वीच्या प्रत्येक नवरात्री उत्सवात अंबाबाई मंदिरामध्ये व्हीआयपी दर्शनाचा मुद्दा सतत वादाचा बनत होता. व्हीआयपी दर्शनाची माहिती तत्कालीन महाराष्ट्र सरकारला दिली होती. सरकारनेही इतर भाविकांचा विचार करुन नियमित दर्शन रांगेशिवाय अन्य कोणत्याही रांगेने भाविकांना मंदिरात सोडण्यासाठी परवानगी नाकारली. दर्शनासाठी पास, प्रवेश पत्रिकेचेही वितरण करण्यास मनाई केली होती. 2010 साली व्हीआयपी दर्शन रोखण्यासाठी न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यावर न्यायालयाने 2012 साली आदेश दिला. या आदेशातून व्हीआयपी दर्शन रोखण्यास सांगितले. अंबाबाईच्या मुख्य दर्शन रांगेव्यतरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने भाविकांना मंदिरात सोडू नये, असेही सांगितले होते.

न्यायालयाच्या आदेशीची माहिती देवस्थान समितीला दिली होती. अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविक कितीतरी तास दर्शन रांगेत उभे राहून असतात. पेड पास निश्चितच सामान्य भाविकांसाठी अन्यायकारक आहेच, शिवाय बेकायदेशीरही असल्याचे समितीच्या निदर्शनास आणून दिले होते. पण तरीही पेड पासचा निर्णय घेतल्याचे मुनीश्वर यांनी म्हटले आहे.

Related Stories

पुणे मिरज लोंढा रेल्वे दुहेरीकरण, विद्युतीकरणगतीने

Abhijeet Shinde

KMC घरफाळा घोटाळा : संजय भोसलेला निलंबित करा; नागरिकांचे बोंबमारो आंदोलन

Abhijeet Khandekar

आक्रोश महापुराचा; बांधणी लोकसभेची

Abhijeet Shinde

शिंगणापूर येथे क्रशर खणीत बुडून एकाचा मृत्यू

Abhijeet Shinde

डिजिटल विश्वात पोस्ट कार्ड टिकून

Abhijeet Shinde

कोल्हापूर : ‘लाभांश’ला 31 मार्च 2021 उजाडणार!

Abhijeet Shinde
error: Content is protected !!