हिंडलगा : आंबेवाडी येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित भगतसिंग हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विभागीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. सदर स्पर्धेत बुद्धिबळमध्ये सर्वेश इंचले (प्रथम), जिम्नॅस्टिक निरज लोहार (प्रथम), कुस्ती व कराटे कमलेश तुडयेकर (प्रथम), सारिका ढोपे कुस्ती (प्रथम), अश्विनी कणबरकर कुस्ती (प्रथम), अदिती आलोजी 860 मी. प्रथम, रेणुका मनोळकर, राधिका जाधव, अस्मिता कातकर यांनी कुस्तीमध्ये वेगवेगळय़ा गटात द्वितीय क्रमांक, हॅमर थ्रोमध्ये प्रगती ढोपे तृतीय त्याचबरोबर 14 वर्षांखालील गटामध्ये 100 मी. स्नेहल तरळे प्रथम, ओमकार चांगळे द्वितीय, 200 मी. अक्षरा अतिवाडकर, अनिकेत चिरमूरकर द्वितीय, 400 मी. पायल शहापूरकर द्वितीय, गोळाफेकमध्ये तीर्थराज मजुकर याने प्रथम तर थाळीफेकमध्ये द्वितीय तसेच राधिका कातकर हिने हर्डलमध्ये द्वितीय असे घवघवीत यश मिळविले. क्रीडाशिक्षक जे. वाय. पाटील यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापिका एस. वाय. संभाजीचे व सर्व शिक्षकांचे प्रोत्साहन लाभले.
आंबेवाडी भगतसिंग हायस्कूलचे क्रीडा स्पर्धेत यश
Advertisements