Tarun Bharat

किल्ल्याचं गाव अंबवडे…

सातारा : दिवाळी म्हटलं की रांगोळी कंदील, फटाके ,फराळ अशा सर्व गोष्टीबरोबर आणखी एक वैशिष्ट म्हणजे किल्ले दिवाळीच्या सुट्टीत घराच्या आवारात किल्ल्यांची प्रतिकृती उभारण्याच्या जुन्या परंपरेकडे सध्याच्या स्मार्टफोन युगात दुर्लक्ष झाले आहे. मात्र, सातारा तालुक्यातील अंबवडे बु गावमध्ये ही परंपरा आजही सुरू आहे, नव्हे तर तिला व्यापक स्वरूप आले आहे. ते पाहण्यासाठी परिसरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील लोक गर्दी करीत असतात, त्यामुळे गावाला ऐन दिवाळीत यात्रेचे स्वरूप येत आहे.

गावात दरवर्षी साधारण ४० ते ५० किल्ले ते ही मोठ्या प्रतिकृतीचे म्हणजे किती तर १ ते २ गुठे तसेच पूर्ण शेतात एवढया मोठ्या आकारात किल्लेउभारले जातात. किल्ला करताना किवा गडकोट किल्ला उभा करताना तो एखाद्या गड दुर्गासारखा हुबेहूब व्हावा असा अट्टाहास नसतो मात्र तो किल्ला उभा करण्यापाठीमागची भावना मात्र राजगडला टक्कर देईल माझा बनवलेला दुर्ग अशी असते. किल्ला बनवताना मुलं कमीत कमी खर्च करत असतात. म्हणजे तटबंदी बनवताना माती, शेण, राख, भुसा चा वापर करून केलेले आहे. तर सैनिक, घर, मंदिर पुठ्ठयांची बनवलेली आहेत. सिंहगड, राजगड, विशाळगड, लोहगड, रायगड, अजिंक्यतारा, सज्जनगड यांसारख्या डोंगरी किल्ल्यांबरोबरच सिंधुदुर्ग, खांदेरी सारखे सागरी किल्ले, राजहंस, कंक्राळा सरखे मैदानी किल्ले देखील हुबेहूब साकारले आहेत. तसेच किल्ल्यांच्या देखाव्याबरोबरच किमान १० मिनट बाल मावळे इतिहास सांगताना अंगावर शहारे येतात. प्रत्येक ठिकाणी सामाजिक संदेश ही दिला गेला आहे. त्याच बरोबर जिवंत देखावा आणी दाणपट्टा फिरवतना चे मावळे बघत किल्ले बघण्याची सुवर्णं संधी सातारकरांना आहे.

Related Stories

जिल्ह्यात शाळा सुरु करण्याच्या हालचाली

datta jadhav

‘रेमडेसिवीर’चे वितरण अन्न व औषध प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसारच

datta jadhav

सोमवार पेठेत ६ लाखांची घरफोडी

datta jadhav

सातारा शहर चा नवा कारभारी कोण ?

Amit Kulkarni

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील विरांगना व समाजवादी नायिकाना शहरात अभिवादन

Patil_p

..अन् ते अतिक्रमीत शेड काढून घेण्याचा शेड मालकाचा उपनगराध्यक्षांना शब्द

Archana Banage