Tarun Bharat

उगाच तोंड उघडायला लावू नका, हवेतून खाली या…; मिटकरींचा केसरकरांना इशारा

ऑनलाईन टीम/तरुण भारत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडांनंतर शिवसेनेत दोन गट पडले. शिंदेंबरोबर ४० आमदार गेले. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला. ठाकरे सरकार कोसळलं. त्यांनतर शिंदे आणि भाजपने सत्ता स्थापन केली. यासर्व पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Dipak Kesarkar) आपल्या गटाची बाजू मदत असतात. त्यांनी काल राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांवर (Sharad Pawar) गंभीर आरोप केलेत. ज्या ज्या वेळी शिवसेना फुटली त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा हात होता. पवारांनी दिवंगत शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना किती यातना दिल्यात हे महाराष्ट्रातील जनतेला सांगाव्या असं वादग्रस्त विधान दीपक केसरकर यांनी केले. त्यांच्या या विधानानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले आहेत. त्यांनी केसरकारांना जशास तसे उत्तर दिल आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी या केसकरांच्या वादग्रस्त विधानावर चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.

त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, केसरकर साहेब सद्या तुम्ही हवेत आहात. पवार साहेबांवर बोलल्याने प्रसिध्दी मिळते हे तुम्ही जाणुन आहात. तुमची अजितदादांसमोर असणारी केविलवाणी अवस्था मी अनेकदा पहिली आहे. उगाच आम्हाला तोंड उघडायला लावू नका. हवेतून खाली या. तसेही तुमची बडबड जास्त दिवस चालणार नाही. दरम्यान दीपक केसरकरांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवरून आता अनेक राजकीय नेत्यांनी आगपाखड केली आहे.

हे ही वाचा : युती सरकारचा मोठा निर्णय; पेट्रोल ५ तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त

जितेंद्र आव्हाडांचा टोला!
दरम्यान, एकीकडे केसरकरांनी ही टीका केली असताना लागलीच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केसरकरांना प्रत्युत्तर दिलं. “अहो केसरकर, किती बोलता शरद पवारांविरुद्ध? एके काळी त्यांनी अनेकांना नाराज करत तुम्हाला सिंधुदुर्ग आणि गोव्यात हाताला धरून फिरवले. ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात? २०१४ ला मीच आलो होतो साहेबांचा निरोप घेऊन. जिथे आहात तिथे सुखी राहा. खाजवून खरूज काढू नका”, असं जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून बंडखोर आमदार दीपक केसरकर हे सातत्याने भूमिका मांडताना दिसत आहेत. सरकार स्थापन झाल्यानंतर देखील दीपक केसरकर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर टीका करताना दिसत आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर त्यांनी केलेल्या टीकेचे पडसाद आता उमटू लागले असून या दोन्ही पक्षांमधील नेतेमंडळी त्यांना प्रत्युत्तर देऊ लागली आहेत.

Related Stories

अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल

Patil_p

खासदार धनंजय महाडिक यांचे शिरोलीत जंगी स्वागत

Abhijeet Khandekar

ठाकरेंना धक्का! विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीवर चौधरींऐवजी भुसे आणि सामंतांचा समावेश

Archana Banage

हरियाणात भाजप विरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको; पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये शेकडो शेतकरी रक्तबंबाळ

Archana Banage

नशेत तर्र पजेरो चालकाची विद्युत पोलला धडक

Archana Banage

गुटखा जोमात गाव कोमात

Archana Banage