Tarun Bharat

अमेरिकेत पुन्हा गोळीबार; तिघांचा मृत्यू, ११ जखमी

Advertisements

ऑनलाईन टीम/ तरुण भारत

नवी दिल्ली : अमेरिकेतील फिलाडेल्फिया इथं आज (५ जून) पुन्हा गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला असून ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. तीन दिवसापूर्वी येथील ओक्लाहोमा इथं हॉस्पिटलच्या आवारात तरुणानं गोळीबार केला होता. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज पुन्हा गोळीबार झाला असून यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेत वारंवार गोळीबाराच्या घटना घडत आहेत. पार्किंगच्या वादातून झालेल्या गोळीबारात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. त्यात दोन जण जखमी झाले होते. त्याचबरोबर टेक्सासमध्ये झालेल्या गोळीबारात 21 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान २ जून रोजी ओक्लाहोमा येथील सेंट फ्रान्सिस हॉस्पिटलच्या आवारात गोळीबार झाला होता, यामध्ये तीन जणांना प्राण गमवावे लागले होते. या गोळीबारात शूटरसह चार जण ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

मेडिकल कॅम्पसमधील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर रायफल असलेल्या एका व्यक्तीनं गोळीबार केल्याचा पोलिसांना फोन आला होता. त्यानंतर अधिकारी घटनास्थळी पोहोचेपर्यंत अनेकांवर गोळ्यांचा वर्षाव झाला. यामध्ये एका जोडप्याचाही मृत्यू झाला होता. पुन्हा आज गोळीबार झाल्याने अमेरिकेत शस्त्र परवाना संबंधीच्या धोरणाचे अत्यंत गंभीर परिणाम दिसून येत आहेत. टेक्सासमध्ये झालेल्या घ़टनेनंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी कठोर भूमिका घेत कारवाईचे आदेश दिले होते. आता घडत असलेल्या घटनेने सरकार काय भूमिका घेते हे पाहावे लागणार आहे.

Related Stories

दिल्लीत चोवीस तासांत 384 कोरोना रुग्ण

Rohan_P

ठरलंय म्हणणाऱ्यांना भाजपची ताकद दाखवू;धनंजय महाडिकांचा इशारा

Abhijeet Khandekar

UP Elections 2022 : छाननी समितीमध्ये वर्षा गायकवाड

Patil_p

पंजाबमध्ये कोरोना बाधितांची एकूण संख्या 14, 996 वर

Rohan_P

अमेरिका : स्थिती नियंत्रणाबाहेर

Patil_p

गुलाबराव पाटलांसह शिवसेनेचे तीन आमदार शिंदेगटामध्ये सामिल

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!