Tarun Bharat

रिक्षा चालवून ऑफिसला जातात अमेरिकन डिप्लोमॅट

Advertisements

4 महिला राजनयिकांनी केली पिंक ऑटो खरेदी

नवी दिल्लीतील अमेरिकेच्या दूतावासातील 4 महिला अधिकारी ऑटो रिक्षा स्वतः चालवून ऑफिसमध्ये जात आहेत. विशेष म्हणजे ही रिक्षा त्यांनीच खरेदी केली आहे. याच रिक्षातून त्या ऑफिसमध्ये पोहोचत आहेत. एल.एन. मेसन, रुथ होल्मबर्ग, शरीन जे किटरमॅन आणि जेनिफर बायवाटर्स यांनी ऑटो रिक्षा चालविणे मजेशीर अनुभव असल्याचे म्हटले आहे.

अमेरिकन अधिकारी देखील सामान्य लोकांप्रमाणेच असल्याचे दर्शवून देणारे हे उदाहरण असल्याचे त्यांचे सांगणे आहे. मी कधीच क्लचयुक्त वाहन चालविले नव्हते. मी नेहमीच ऑटोमॅटिक कार चालवायचे. परंतु भारतात ऑटो रिक्षा चालविणे एक नवा अनुभव होता. पाकिस्तानात असताना मोठय़ा आणि आलिशान बुलेटप्रूफ वाहनातून फिरायचे. त्यातूनच ऑफिसला जायचे, परंतु बाहेर रिक्षा दिसल्यावर ती एकदा चालवावी अशी इच्छा व्हायची. याचमुळे भारतात बदली झाल्यावर एक ऑटो रिक्षा खरेदी केली. माझ्यासोबत रुथ, शरीन आणि जेनिफर यांनीही रिक्षा खरेदी केल्याचे एन.एल. मेसन यांनी सांगितले आहे.

मला माझ्या आईकडून याकरता प्रेरणा मिळाली. ती नेहमीच काही तरी नवे करत असायची. तिनेच मला संधीचा लाभ घेणे शिकविले. माझी मुलगीही ऑटो रिक्षा चालविणे शिकत आहे. या रिक्षामध्ये मी माझ्या सोयीनुसार बदल केले आहेत. यात ब्ल्यूटूथ डिव्हाइस बसविले असून टायगर प्रिंटेड पडदेही लावले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

भारतीय वंशाच्या अमेरिकन डिप्लोमॅट शरीन जे किटरमॅन यांच्याकडे पिंक ऑटो आहे. याच्या रियर-ह्यू-मिररमध्ये अमेरिका आणि भारताचा ध्वज लावलेला आहे. किटरमॅन यांचा जन्म कर्नाटकात झाला होता, पुढील काळात त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या होत्या. त्यांच्याकडे अमेरिकेचे नागरिकत्व आहे.

मेक्सिकन राजदूत मेल्बा प्रिआ यांच्याकडून रिक्षा चालविण्याची प्रेरणा मिळाली. 10 वर्षांपूर्वी त्यांच्याकडे एक पांढऱया रंगाची रिक्षा होती, त्यांच्याकडे एक चालकही होता. भारतात आल्यावर मेसन यांच्याकडे रिक्षा असल्याचे पाहिल्यावर मी देखील एक रिक्षा खरेदी केल्याची माहिती किटरमॅन यांनी दिली आहे.

लोकांना भेटणे एकप्रकारची डिप्लोमसी

मला ऑटो रिक्षा चालविणे अत्यंत आवडते. बाजारात मी यातूनच जाते. येथील लोकांना भेटते. मला पाहून येथील महिलांना प्रेरणा मिळत असावी. माझ्यासाठी डिप्लोमसी उच्चस्तरावर नाही, डिप्लोमसीचा अर्थ लोकांच्या गाठीभेटी घेणे, त्यांना जाणणे आणि त्यांच्यासोबत बंध निर्माण करणे असा आहे. हे सर्व मी रिक्षा चालवून करू शकते. मी दरदिनी लोकांना भेटत असते असे अमेरिकन अधिकारी रुथ होल्मबर्ग यांनी म्हटले आहे.

नव्या गोष्टी शिकणे अवघड नाही

अनेकदा लोकांना जाणून घेण्यासाठी चौकटीबाहेर जात विचार करावा लागतो. दिल्लीत आल्यावर मी मेसन यांच्यासोबत रिक्षातून जात होते. नंतर मीच रिक्षा खरेदी केली. ती चालविणे अवघड होते, परंतु मी शिकले. शिकणे अवघड नसले तरीही आसपास ये-जा करत असलेल्या वाहनांना लक्षात घेत ड्रायव्हिंग करणे अवघड आहे. येथे कुणीही अचानक आडवा येत असतो. कधीकधी हे भीतीदायक असले तरीही यात मोठी मजा येत असल्याचे जेनिफर यांचे म्हणणे आहे.

Related Stories

पेटत होते रुग्णालय, शस्त्रक्रिया करत राहिले देवदूत

Patil_p

मृतदेहातही कोरोना विषाणू जिवंत

Patil_p

युएई : लोकसंख्येपेक्षा अधिक कोरोना चाचण्या

Patil_p

चीनची पुन्हा अमेरिकेला धमकी

Patil_p

दुर्घटना, प्रदूषण कमी करण्याची मोहीम

Patil_p

प्रथम कोरोना लस आणण्याचा मान रशियाला

Patil_p
error: Content is protected !!