व्हिडीओ व्हायरल, संबंधित महिलेला अटक
वॉशिंग्टन
अमेरिकेतील टेक्सासमध्ये एका मेक्सिकन-अमेरिकन महिलेने चार भारतीय-अमेरिकन महिलांवर वांशिक शेरेबाजी केल्याचा प्रकार उघड झाला आहे. आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. एका व्हिडीओमध्ये ती मेक्सिकन-अमेरिकन असल्याचे दाखवून भारतीय-अमेरिकन महिलांवर हल्ला करताना दिसत आहे. टेक्सासमधील डलास येथील एका पार्किंग परिसरात बुधवारी रात्री ही घटना घडली. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भारतीय-अमेरिकन समुदायाला धक्का बसला आहे. यामध्ये सदर महिला वर्णद्वेषी टिप्पणी करताना दिसत आहे.