Tarun Bharat

अमेरिकेची कोको गॉफ उपांत्य फेरीत

वृत्तसंस्था/  ऑकलंड

डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय ऑकलंड खुल्या  टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या टॉप सिडेड कोको गॉफने शुक्रवारी महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठताना चीनच्या झु लीनचा पराभव केला. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेली इमा राडूकेनूने उपलब्ध टेनिस कोर्टवर वादग्रस्त टीका केली होती पण स्पर्धा आयोजकांनी ही टीका निष्फळ असल्याचे सांगितले.

महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या गॉफने चीनच्या झू लिनचा 6-3, 6-2 असा सरळ सेटस्मध्ये 73 मिनिटांच्या कालावधीत पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. चीनच्या झू लिनने या स्पर्धेत या पूर्वीच्या सामन्यात अमेरिकेच्या व्हिनस विलियम्सचा पराभव केला होता. माँटेनग्रोच्या सातव्या मानांकित डंका कोविनिकने कुझमोव्हाचा 6-3, 6-2 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. गॉफ आणि कोविनिक यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होईल.

या स्पर्धेत दुसऱया फेरीतील सामना राडुकेनू आणि व्हिक्टोरिया कुझमोव्हा यांच्या खेळवला गेला होता. दरम्यान या सामन्यात खेळताना राडुकेनूला दुखापत झाल्याने तिने स्पर्धेतून माघार घेतली. तिच्या घोटय़ाला दुखापत झाली असून तिने टेनिस कोर्टच्या दर्जावर टीका केली. या कोर्टवर खेळताना खेळाडूचे पाय घसरत असल्याचे दिसून आले असे तिने म्हटले आहे पण स्पर्धा आयोजकांनी ही टीका चुकीची असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

कॅनडाच्या तृतीय मानांकित लैला फर्नांडिजला उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात हार पत्करावी लागली. बेल्जियमच्या येसालीने बोनाव्हेंचरने लैला फर्नांडिजचा 6-4, 6-2 तसेच स्पेनच्या रिबेका मॅसारोवाने कॅरोलिना मुचोव्हाचा 7-6 (7-4), 7-6(7-2) असा पराभव केला.

Related Stories

डु प्लेसिसच्या शतकाने दक्षिण आफ्रिकेला आघाडी

Patil_p

ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेतून फेडरर बाहेर

Patil_p

‘बायो-बबल’ तोडले तर मिळेल ‘ही’ शिक्षा!

Patil_p

स्वायटेक, रिबेकिना, साबालेंका, सॅकेरी उपांत्य फेरीत

Patil_p

राजस्थान रॉयल्सचा बेन स्टोक्स पहिल्या टप्प्यातून बाहेर?

Patil_p

ब्रिटिश ग्रां प्रिमध्ये हॅमिल्टन विजेता

Patil_p