वृत्तसंस्था/ मिलान
एटीपी टूरवरील येथे झालेल्या नेक्स्ट जनरल पुरुषांच्या खुल्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेचा टेनिसपटू ब्रेन्डॉन नाकाशिमाने एकेरीचे जेतेपद मिळवताना झेकच्या लिसॅकचा अंतिम फेरीत पराभव केला.
शनिवारी खेळवण्यात आलेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या 21 वर्षीय आणि 49 व्या मानांकित नाकाशिमाने झेकच्या 74 व्या मानांकित लिसेकाचा 4-3 (7-5), 4-3 (8-6), 4-2 असा पराभव केला. या स्पर्धेमध्ये 21 वर्षाखालील वयोगटातील 8 सर्वोत्तम टेनिसपटूंचा सहभाग होता. एटीपी टूरवरील नाकाशिमाचे चालू वर्षीच्या टेनिस हंगामातील हे पहिले विजेतेपद आहे. गेल्या वर्षी ही स्पर्धा स्पेनच्या ऍलकॅरेझने जिंकली होती.