प्रतिनिधी/ सातारा
गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करणारे व्यावसायिक अमित भोसले खून प्रकरणातील पत्नीसह सहाही संशयितांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यांना 10 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, पोलीस कोठडीत आणखी काही बाबींची उकल होण्याची शक्यता आहे.
व्यावसायिक अमित भोसले यांच्या हत्येची सुपारी पत्नी रागिनी भोसले (रा. शुक्रवार पेठ सातारा) हिने दिली याची कबुली तिने देताच सर्वत्र खळबळ उडाली. पोलिसांनी पत्नी रागिनी भोसले हिच्यासह अभिषेक चतुर (वय 27, रा. नांदगिरी ता. कोरेगाव), शुभम चतुर (वय 27, रा. कोरेगाव, सध्या पुणे), राजु पवार (वय 26, रा. पंताचा गोट), सचिन चव्हाण (वय 22, रा. मुळशी पुणे), सुरज कदम (वय 27, रा. खेड ता. सातारा) यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता 10 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. अधिक तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके करत आहेत.