Tarun Bharat

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी अमित पाटकर कायम

नव्या समितीत नव्या चेहऱयांना संधी

प्रतिनिधी /पणजी

गोवा प्रदेश काँग्रेसने पक्षाला उभारी देण्याच्या उद्देशाने नव्या समितीची घोषणा केली आहे. या समितीत युवा दमाच्या नव्या चेहऱयांना संधी देण्यात आली असून, जुने व नवे कार्यकर्ते या समितीत असल्याचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले.

गोवा प्रदेश काँग्रेस समितीने घोषणा केलेल्या नव्या समितीत प्रभारी दिनेश गुंडू राव, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, खासदार फ्रान्सिस सार्दिन, एदुआर्द फालेरो, आमदार कार्लुस फेरेरा, आमदार ऍल्टन डिकॉस्ता, रमाकांत खलप, गिरीश चोडणकर, एम. के. शेख, विर्यातो फर्नांडिस व बीना नाईक यांचा समावेश आहे.

अमरनाथ पणजीकर यांच्याकडे प्रसारमाध्यम विभागाची जबाबदारी देण्यात असून, ऑर्विले दोरादो यांची खजिनदारपदी निवड झाली आहे.

काँग्रेसला पुन्हा उभारी येईल : पाटकर

राहुल गांधी यांना ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान महाराष्ट्रात मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने गोव्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण झाले आहे. गोवा प्रदेश काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेल्या आठ आमदारांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर पक्षाचे कार्य काहिसे थंडावले होते. परंतु आता नवीन समिती निवडण्यात आल्याने काँग्रेस पक्षाला पुन्हा उभारी येईल, असा विश्वास पाटकर यांनी व्यक्त केला आहे.

एम. के. शेख वरिष्ठ उपाध्यक्षपदी

प्रदेशाध्यक्ष पाटकर यांच्या नेतृत्वाखाली घोषणा करण्यात आलेल्या या समितीवर एम. के. शेख यांना वरिष्ठ उपाध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले आहे. प्रमोद साळगावकर, सुभाष फळदेसाई, विठोबा देसाई, तुलियो डिसोझा, सुनील कवठणकर यांना समितीच्या उपाध्यक्षपदी ठेवण्यात आले आहे.

या समितीत एकूण 14 सरचिटणीस म्हणून निवडण्यात आले असून, त्यात वरद म्हार्दोळकर, अर्चित नाईक, रॉयला फर्नांडिस, श्रीनिवास खलप, जितेंद्र गावकर, जोसेफ वाझ, विजय भिके, इव्हर्सन वालीस, राजेश वेरेकर, मोरेना रिबेलो, विरियातो फर्नांडिस, मनिषा उसगावकर, सावियो डिसोझा प्रदीप नाईक यांचा समावेश आहे.

कार्यकारी समिती पदाधिकारी

आल्तिन गोम्स, बाबी बागकर, गुरुदास नाटेकर, एल्विस गोम्स, कार्लुस आल्मेदा, विकास प्रभुदेसाई, नितीन चोपडेकर, मेघःश्याम राऊत, नाझीर बेग, शंभू भाऊ बांदेकर, सुनीता वेरेकर, धर्मा चोडणकर, सुरेंद्र फुर्तादो, प्रदीप देसाई यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Related Stories

मुख्यमंत्र्यांचे ते आश्वासन आपल्यासाठी अभिमानाचा क्षण : युरी आलेमाव

Amit Kulkarni

देव बोडगेश्वरच्या अध्यक्षपदी आनंद भाईडकर यांची हॅट्रिक

Amit Kulkarni

खर्रेवाडे सुकुर वेताळ देवस्थानचा 4 रोजी वर्धापनदिन

Amit Kulkarni

वाळपई आठवडा बाजार बेगमीच्या वस्तूंनी फुलला

Amit Kulkarni

वाहने चोरणारी टोळी गजाआड

Patil_p

सावित्रीबाई फुले जयंती 3 जानेवारी रोजी पर्वरीत

Patil_p