Amit Shaha : गणेशोत्सव काळात महाराष्ट्रात असणं हा एक वेगळाच अनुभव असतो. मी आज मुंबईत लालबागच्या राजाला भेट देईन, त्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सवासाठी वांद्रे पश्चिमेला जाईन. नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या एएम नाईक शाळेचे उद्घाटन शिक्षक दिनानिमित्त दुपारी पवई येथे होणार आहे. असे ट्विट अमित शहा यांनी केलं आहे.
अमित शाह यांच्या दौऱ्यानिमित्त मुंबई शहरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह्याद्री अतिथीगृहावर अमित शाह यांच्या भेटीला गेले आहेत.
या दौऱ्यानिमित्ताने 4 आणि 5 सप्टेंबर रोजी मध्य मुंबई, दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरातील काही भागात वाहतुकीचे नियम लागू होणार आहे. आज अमित शाह लालबागच्या राजाचे दर्शन घेणार असून सुरक्षेच्या कारणास्तव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत दर्शनाला जाणार नाहीत.


previous post
next post