Tarun Bharat

मी मोदींचे दु:ख जवळून पाहिले, आज सत्य सोन्यासारखे बाहेर आले – अमित शाह

ऑनलाईन टीम/तरुण भारत

गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या दंगलीप्रकरणी (Gujarat riots) तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना सुप्रीम कोर्टाने (Supreme Court of India) क्लीन चिट दिली आहे. गुजरात दंगलीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांनी एएनआय या वृतसंस्थेला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत गुजरात दंगली प्रकरणात मोदींवर केलेले सर्व आरोप सर्वोच्च न्यायालयाने सर्व आरोप फेटाळून लावल्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले आहे. 2002 मध्ये झालेल्या या गुजरात दंगलीबाबत अनेक मोठे खुलासे अमित शाह यांनी केले.

सत्य सोन्यासारखे बाहेर आले
अमित शाह यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या क्लीन चीटवर समाधान व्यक्त केले आहे. गुजरात दंगली नेहमीच राजकीय नजरेतून पाहिल्या गेले, मात्र आज सत्य हे सोन्यासारखे बाहेर आले आहे तर त्याचा आनंद होणार नाही का. मी मोदींना फार जवळून हे दुःख झेलताना पाहिले आहे. या आरोपांना झेलताना पाहिले आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरु असल्याने आम्ही काहीच बोललणार नाही हे एक खंबीर मनाची व्यक्तीच करु शकते. आताची मुलाखत मी २००३ मध्ये गुजरातचा गृहमंत्री म्हणून देऊ शकलो असतो. पण न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत मोदींनी यावर काही भाष्य केले नाही. शांतपणे सहन करत राहिले,” असे गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

दंगलीवरील आरोप फेटाळताना अमित शाह म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने सर्व आरोप फेटाळले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने हे सिद्ध झाले आहे की, सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित होते. न्यायालयाने निर्णय दिला की, सरकारने शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, गुजरात दंगलीकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहिले गेले. गुजरात दंगली प्रकरणातील मोंदींवर केलेले आरोप हे राजकीय सुडीबुद्धीने केल्याचे सुप्रीम कोर्टाने सिद्ध केले. असही अमित शाह म्हणाले.

मलाही अटक करण्यात आली

“१९ वर्षानंतर सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने जो निकाल दिला आहे त्यानुसार पंतप्रधान मोदींवर लागलेले सर्व आरोप नाकारले आहेत. हे आरोप राजकीयदृष्ट्या प्रेरित आहेत असेही कोर्टाने म्हटले आहे.यामुळे भाजपा सरकारव जो डाग लागला होता तोही निघून गेला आहे. यावरुन पंतप्रधान मोदींनी लोकशाहीमध्ये संविधानानुसार काम कसे होऊ शकते याचे उदाहरण सर्व राजकीय पक्षांसमोर ठेवले आहे. पंतप्रधान मोदींची पण चौकशी झाली होती. त्यांनी आंदोलन नाही केले. देशभरातील कार्यकर्त्ये मोदींच्या समर्थनाथ उभे राहिले नाहीत. आम्ही कायद्याचे पालन केले. मलाही अटक करण्यात आली होती. पण एवढ्या मोठ्या लढाईनंतर सत्य जेव्हा समोर येते तेव्हा ते सोन्यापेक्षाही जास्त चमकते,” असेही अमित शाह म्हणाले.

Related Stories

पेट्रोल – डिझेलच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घट

Tousif Mujawar

विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड

datta jadhav

राज्यात विधानपरिषदेची निवडणुक जाहीर; २० जूनला मतदान

Rahul Gadkar

रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्ज अवैध ठरणार

Amit Kulkarni

कर्नाटक: रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यांना गृहमंत्र्यांच्या इशारा

Archana Banage

सलग दुसऱया दिवशी 18 हजारांवर रुग्ण

Patil_p