Tarun Bharat

खडसेंना 3 तास ऑफिसबाहेर बसवून अमित शाह यांनी भेट नाकारली

Advertisements

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) त्यांच्या सूनबाई रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्यासह दिल्लीत अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी खडसेंना तीन तास ऑफिसबाहेर बसवून शाह यांनी भेट नाकारली होती, असा गौप्यस्फोट मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केला आहे.

गिरीश महाजन म्हणाले, काही दिवसांपूर्वी खडसे स्वगृही परतणार असल्याची चर्चा होती. दरम्यानच्या काळात खडसे सूनबाई रक्षा खडसे यांच्यासह दिल्लीत अमित शाह यांची भेट घेण्यासाठी पोहचले होते. अमित शाह यांच्या ऑफिसबाहेर हे दोघेही तीन तास बसून होते. पण त्यांना शाह यांनी भेटीची वेळ दिली नाही. त्यावेळी रक्षा खडसे यांचा मला फोन आला. त्यांनी मला सांगितलं की तीन तास ऑफिसबाहेर बसून आहोत, पण शाह यांनी भेट नाकारली. त्यानंतर खडसे यांनी फोनवर अमित शाह यांच्यासोबत बोलणं झाल्याचं म्हटलं होतं.

अधिक वाचा : पाणीबिल वादातून मुख्यमंत्र्यांवरील हल्ल्याबाबत खोटी माहिती

दरम्यान, एकनाथ खडसेंकडून सगळं मिटवण्याची भाषा केली जात असल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे. त्यामुळे खडसे पुन्हा भाजपात येणार का? अशी चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Related Stories

साताऱयात ट्रक कोसळून लाखो रुपयांचे नुकसान

Patil_p

कोल्हापूर : सलग तिसऱ्या दिवशी ‘कोरोना’चे २१ बळी

Archana Banage

महिला आंदोलकांचा मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

datta jadhav

माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल

Tousif Mujawar

कोरोनाचा कहर! महाराष्ट्रात 6.68 लाखांपेक्षा अधिक ॲक्टिव्ह रुग्ण

Tousif Mujawar

शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांची बुद्धी भ्रष्ट केलीयं-चंद्रशेखर बावनकुळे

Archana Banage
error: Content is protected !!