Tarun Bharat

काश्मीरच्या दौऱयावर जाणार अमित शाह

गुज्जरांना आरक्षण देण्यासंबंधी चर्चा ः पुढील वर्षी निवडणूक शक्य

वृत्तसंस्था / श्रीनगर

जम्मू-काश्मीरमध्ये मार्च 2023 मध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. परिसीमन आयोगाने स्वतःची प्रक्रिया पूर्ण केली आहे. याचदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे 1-2 ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीरच्या दौऱयावर असतील. 2 ऑक्टोबर रोजी ते उत्तर काश्मीरमध्ये पहाडी तसेच गुज्जरांच्या मोठय़ा सभेला संबोधित करणार आहेत. मोठे आर्थिक पॅकेज तसेच पहाडी भाषिक समुदायासाठी आरक्षणाची घोषणा त्यांच्याकडून होणार असल्याचा कयास वर्तविण्यात येत आहे.

भाजप यावेळी मुस्लीम समुदायापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. श्रीनगरच्या ईदगाहमध्ये वफ्फ बोर्डाच्या कॅन्सर रुग्णालयाच्या कामाचा शुभारंभ शाह यांच्या हस्ते होणार आहे. तसेच हुतात्मा पोलिसांच्या कुटुंबीयांना भेटणार आहेत. यातील बहुतांश जण हे काश्मिरी मुस्लीम आहेत.  जम्मू-काश्मीर भाजप प्रमुख रविंद्र रैना यांनी अलिकडेच सीमावर्ती भागांमध्ये गुज्जर तसेच बकरवाल समुदायाला पक्षाच्या बाजूने आकृष्ट करण्यासाठी सभा घेतल्या होत्या.

बहुमत गाठण्याचा प्रयत्न

जम्मू-काश्मीरमधील गुज्जर समुदायाचे मुस्लीम गुलाम अली यांना अलिकडेच राज्यसभेवर राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर बहुमत मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. केंद्रशासित प्रदेशातील 12 मतदारसंघांमध्ये पहाडी भाषिक समुदायाचा प्रभाव आहे. या समुदायाची मोठी लोकसंख्या जम्मू विभागातील पुंछ तसच राजौरी जिल्हय़ात आहे. तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्हय़ातील लक्षणीय लोकसंख्या आहे. पहाडी भाषिक लोक हे बकरवा तसेच गुज्जर मुस्लीम आहेत. जम्मू-काश्मीरच्या लोकसंख्येत त्यांचे प्रमाण सुमारे 15 टक्के आहे.

Related Stories

केरळनंतर दिल्लीत मंकीपॉक्सचा रुग्ण

Patil_p

‘येस बँके’च्या राणा कपूर यांना जामीन

Patil_p

सिद्धू अन् मुख्यमंत्री चन्नी केदारनाथच्या दरबारात

Patil_p

अंदमानमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Patil_p

गुजरातमध्ये नवरात्रोत्सव गरब्याविना!

Patil_p

‘व्हर्च्युअल’ बैठकीवेळी पंतप्रधान भावुक

Patil_p