Amitabh Bachchan on Elon Musk : सध्याचे ट्विटरचे मालक एलन मस्क हे कोणत्या-ना कोणत्या कारणावरून चर्चेत असताताचं.ट्विटरची ओळख असलेला ब्ल्यु बर्ड लोगो बदलण्याचा निर्णयानंतर आता एलन मस्क यांनी अनेकांच्या नावासमोरून ब्लू टिक काढून टाकलं आहे. यामध्ये अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन यांचा देखील समावेश आहे.आज अमिताभ बच्चन यांनी एलन मस्क यांना टॅग करत ब्लू टिक देण्याची मागणी केली आहे. यावर अनेक चाहत्यांनी कमेंन्टचा पाऊस पाडला आहे.
काय म्हटलयं ट्विटमध्ये
ए ट्विटर भाऊ! तुम्ही ऐकत आहात का? आता आम्ही पैसेही भरले आहेत… तर ते ब्लु टिक आहे ते परत द्या कि आम्हाला, जेणेकरून लोकांना कळेल की आम्हीच आहोत – अमिताभ बच्चन.. हात जोडून आम्ही विनंती करत आहोत. आता काय तुझ्या पाय पडू का? असं ही त्यांनी म्हटलयं. यावर अनेक चाहत्यांनी कमेंन्ट केल्या आहेत.
एका चाहत्याने कौन बनेगा करोडपती रिअॅलिटी शो मधील फोटो शेअर केला आहे. यातअमिताभ बच्चन प्रत्येक स्पर्धकाला विचारता की इतक्य़ा पैशाचं तुम्ही काय करणार आहात .तर यावर एका चाहत्याने म्हटलयं की, तुमच्यासारखं ब्लू टीकसाठी पैसे भरणार. तर अनेकांनी काळजी करू नका 4 दिवसता येईल ब्लू टिक अस म्हटलयं. तर अनेकांनी हात जोडायची गरज नाही, एलन मस्क ला हिंदी समजत नाही असं देखील म्हटलय.