नवी दिल्ली : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आपले नाव, प्रतिमा, आवाज आणि व्यक्तिमत्त्वाला संरक्षण मिळण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हा दावा संपूर्ण कला क्षेत्र आणि विविध अर्थिक अस्थापनांविरूध्द केला आसून त्यांच्या आवाजाची आणि प्रतिमेची कोणी नक्कल करू शकणार नाही. अमिताभ बच्चन यांच्यावतीने प्रसिद्ध वकील हरीश साळवे यांनी बाजू मांडली.
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नवीन चावला यांनी शुक्रवारी बच्चन यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि प्रसिद्धीच्या अधिकारांचे उल्लंघन न करण्याचे अंतरिम आदेश जारी केला. न्यायमूर्ती चावला यांनी नमूद केले की, अनेकजण अमिताभ बच्चन या दिग्गज अभिनेत्याच्या सेलिब्रेटी स्टेटसचा वापर त्यांच्या परवानगीशिवाय स्वतःच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी वापरत आहेत.
“अमिताभ बच्चन हे सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व असून विविध जाहिरातींमध्येही त्यांचे प्रतिनिधित्व केले बच्चन यांच्या परवानगीशिवाय किंवा अधिकृत मान्यतेशिवाय वस्तू आणि सेवांची जाहिरात करण्यासाठी त्यांच्या सेलिब्रिटी स्टेटसचा वापर होऊ शकत नाही.” असेही न्यायमुर्तींनी नमुद केले.