ऑनलाईन टीम / तरुण भारत :
संघटित गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी मोक्का कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणारे पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे.
अमिताभ गुप्ता यांची दोन दिवसांपूर्वी अपर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था मुंबई येथे बदली करण्यात आली होती. मात्र, आज नव्याने प्राप्त झालेल्या आदेशात गुप्ता यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. गुप्ता यांची नियुक्ती आता अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य, पुणे येथे करण्यात आली आहे.
अधिक वाचा : …त्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
राज्यातील पंधरा आयपीएस अधिकाऱ्यांच्या प्रमोशनवर बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये अमिताभ गुप्ता यांची बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी रितेश कुमार यांची पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते सन 1992 सालच्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.