थंडीच्या दिवसात आवळा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो.आकाराने छोटा आणि चवीला तुरट असेलेला आवळा फकत त्वचा आणि केसच नाही तर संपूर्ण शरीरासाठी आवळा गुणकारी आहे.आयुर्वेदामध्ये आवळ्याला श्रेष्ठ मानले जाते.चला तर मग या बहुगुणी आवळ्याचे फायदे जाणून घेऊया.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, आयर्न, व्हिटॅमिन बी यासारखे पोषक घटक असतात. जे आपल्याला अनेक रोगांपासून दूर ठेवण्यास मदत करतात.
त्याबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करते.
आवळा आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. त्यात अँटिऑक्सिडंट असतात जे तुमची त्वचा तरूण ठेवण्यास मदत करतात. यामुळे आहारामध्ये आवळ्याचा समावेश नक्की करा.
उच्च रक्तदाब, मधुमेही रुग्णांसाठी आवळा गुणकारी आहे. अनेक डॉक्टर हाय ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी आवळा ज्यूस पिण्याचा सल्ला देतात.
बद्धकोष्टता, गॅस, अॅसिडिटी अशा पोटासंबंधी अनेक समस्यांमध्ये आवळा फायदेशीर ठरतो. पचन समस्येवर आवळा हा नैसर्गिक उपाय आहे. तसेच आवळ्याचा रस पायल्याने अल्सर आणि पोटातील संसर्गाचा धोका कमी होतो.
केसांच्या समस्यांवर आवळा हे तर उत्तम औषध आहे.जवळपास केसांवरील सर्वच प्रॉडक्ट्स मध्ये आवळ्याचा वापर केला जातो. यामुळे डोकं शांत राहतं. तसेच केसांच्या तक्रारीही दूर होतात. केस गळत असतील तर आवळ्याच्या तेलाने केसांच्या मुळाशी मालिश करावी.
रक्तशुद्धीकरण आणि रक्ताभिसरणासाठी आवळा उत्तम प्रकारे काम करतो.आवळ्याचा रस पिल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.

