Tarun Bharat

नक्कीच काहीतरी वेगळे होणार; अमोल मिटकरींचे सूचक वक्तव्य

Advertisements

ऑनलाईन टीम/ तरुण भारत

शरद पवारांनी (Sharad Pawar) राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेतली. उद्या पुन्हा पवारांनी मुंबईत आमदारांची बैठक बोलावली आहे. राज्यातील राजकीय नाट्यावर शरद पवारांनी आमदारांबरोबरच चर्चा केली असून, राष्ट्रवादी काॅंग्रेस पूर्ण ताकदीने मविआच्या पाठीशी असल्याची माहिती आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी माध्यमांना दिली. तसेच त्यांनी ट्विट करत भाजपला इशारा दिला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रात मविआला फोडण्याचे काम भाजप करत आहे. त्यांनी यासाठी पैसा लावला असल्याचे समोर आले आहे. पण जोपर्यंत शरद पवार खंबीरपणे या आखाड्यात उभे आहेत तोपर्यंत त्यांची कधीही इच्छा पूर्ण होणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करायची भाजपची इच्छा आहे ती कधीही पूर्ण होणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

हेही वाचा- सेना विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले; एकनाथ शिंदेंची ट्विट करत माहिती

गुजर जायेगा ये दौर भी, जरा सा इत्मीनान तो रख, जब खुशियाॅं ही नहीं ठहरी, तो गम की क्या औकात है !! या ट्विटविषयी विचारताच ते म्हणाले, राज्यात सध्या जे वातावरण आहे ते लवकरच निवळेल. आणि जे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही असेही ते म्हणाले.

हेही वाचा- मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य; यापुढे असेच सहकार्य राहू द्या

एकनाथ शिंदे यांच्या बंडाविषयी बोलताना ते म्हणाले, सेनेचे दोन आमदार सुरत वरुन परत आले त्यांना कशी ट्रिटमेंन्ट दिली हे तुम्ही पाहिले. संध्याकाळी ५ वाजेपर्यत मुंबईत परत नाही आला तर तुमचे सदसत्व रद्द होईल असे आज शिवसेने अधीकृत पत्रक काढले आहे. काही आमदारांनी परत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे नक्कीच काहीतरी वेगळे होणार असल्याचे मिटकरी म्हणाले.

Related Stories

राज्यातील कोरोना नियंत्रणात, परंतू संपलेला नाही – वडेट्टीवार

Archana Banage

अमेरिकेत अपहरण झालेल्या भारतीय वंशाच्या कुटुंबाच्या हत्येने खळबळ

Archana Banage

दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिक रवाना

Anuja Kudatarkar

मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न

Archana Banage

थकीत वीज बीलांची वसुली, वीज तोडणी थांबविण्यासह तोडलेल्या जोडण्या पुर्ववत करा

Tousif Mujawar

विधानपरिषदेच्या 12 सदस्यांच्या नावाची यादी राज्यपालांकडेच; सुनावणी दरम्यान उघड

Archana Banage
error: Content is protected !!