Tarun Bharat

अमरावती लव्ह जिहाद प्रकरणात नवा ट्विस्ट; ‘या’ कारणामुळं तरुणीनं सोडलं घर

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

Amravati News : अमरावतीमध्ये लव्ह जिहाद प्रकरणामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. एका मुलीला पळवून नेऊन आंतरधर्मीय विवाह केल्याचा प्रकरण समोर आल्यानंतर वातावरण चांगलेच तापले होते. मात्र आता या लव्ह जिहाद प्रकरणातील तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही तरुणी साताऱ्यात सापडली असून, पोलिसांनी या तरुणीला ताब्यात घेत चौकशी केली असता वेगळीच माहिती समोर आली आहे.

दरम्यान, अमरावती प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला असून कुटुंबीयांच्या त्रासाला कंटाळूनच संबंधित मुलगी घर सोडून गेली होती अशी माहिती आता समोर आली आहे. बुधवारी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी हे प्रकरण लव्ह जिहादचं असल्याचा आरोप करत पोलिसांवरही आरोप केले होते. त्यावरुन काल मोठा गदारोळ झाला होता. आता या प्रकरणातील मुलीला पोलिसांनी शोधून काढलं असून ती मुलगी घरच्यांच्या त्रासाला कंटाळून पळून गेली होती असं स्पष्ट झालं आहे.

अमरावतीलमधून पळून गेलेल्या तरुणीने सातारा पोलिसांना तसा जबाब दिला असून ती तरुणी आज रात्रीपर्यंत अमरावतीमध्ये पोहोचणार असल्याची माहिती आहे. ती अमरावतीमध्ये आल्यानंतर तिचा सविस्तर जबाब घेण्यात येईल असं अमरावतीच्या पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे.

Related Stories

शासकीय खर्चातून भाविकांना रिक्षा सेवा पुरविणार

Archana Banage

रत्नागिरी : हातीसचा उरूस ५० जणांच्या उपस्थितीत होणार साजरा

Abhijeet Khandekar

ममता बॅनर्जींच्या सरकारमधील मंत्र्याला ईडीकडून अटक

Archana Banage

ठाकरे सरकारकडून शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात 2297 कोटींची मदत

Tousif Mujawar

भारताकडून आणखी 54 ॲप्सवर बंदी

datta jadhav

एसबीआयकडून गृहकर्जाच्या व्याजदरात कपात

datta jadhav
error: Content is protected !!