Tarun Bharat

अमृता फडणवीसांना धमकी, लाच देण्याचा प्रकार, विधानसभेत देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण

Devendra Fadnvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांना धमकी आणि लाच देण्याचा प्रकार धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी डिझायनर अनिक्षा आणि तिच्या वडिलांविरोधात मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ‘इंडियन एक्सप्रेस’ या दैनिकात याबाबत वृत्त प्रकाशित करण्यात आले. याबाबत आज विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर विधानसभेत फडणवीसांनी निवेदन देत यासंदर्भात स्पष्टीकरण दिले.

या घटनेसंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले,माझ्या पत्नीने पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.पहिले पैसे ऑफर करण्यात आले.त्यानंतर ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आला.त्याची वस्तुस्थिती अशी आहे की, अनिल जयसिंघांनी नावाचा एक व्यक्ती असून, तो सात आठ वर्ष झालं फरार आहे. त्याच्यावर १४ ते १५ गुन्हे दाखल आहेत. याची एक मुलगी २०१५-१६ दरम्यान पत्नीला भेटत होती. नंतर अचानक भेटणं बंद झालं. २०२१ साली पुन्हा तिने पत्नीला भेटणं चालू केलं. तेव्हा तिने सांगण्यास चालू केलं, मी डिझायनर आहे, कपडे आणि दागिने तयार करते. माझी आई वारसी आहे तिच्यावर एक पुस्तक प्रकाशन करा.आम्ही घरच्या घरी पुस्तक छापून घेतलं. यातून आमचा विश्वास संपादन केलं. तिने घरी येणे- जाणे ठेवले.

काही दिवसांनी तिने सांगितले की माझ्या वडिलांना फसवण्यात आले आहे त्यांना सोडवा अशी विनंती करण्यास सुरुवात केली. त्यावर पत्नीने काही असेल तर मला निवेदन देण्यास सुचवलं. त्यानंतर काही दिवसांनी तिच्या वडिलांना सोडवण्यासाठी १ कोटी रुपयांची ऑफर दिली. मात्र, चुकीचं अडकले असतील, तर पोलिसांकडून सोडवता येईल, असं पत्नी म्हणाली. पण, तिने सातत्याने बुकींचा विषय काढल्यावर पत्नीने तिला फोनवर ब्लॉक केलं. ब्लॉक केल्यावर दोन दिवसांनी अनोळखी नंबरवरून काही व्हिडीओ आणि क्लीप आल्या.यातील एक व्हिडीओ गंभीर होता. त्यात ही मुलगी बाहेर कुठेतरी बॅगेत पैसे भरत आहे. दुसऱ्या व्हिडीओत ती मुलगी आमच्या घरातील महिला कर्मचाऱ्याला बॅग देताना दिसत आहे. नंतर पत्नीला त्या व्यक्तीने धमकी दिली की, हे व्हिडीओ आम्ही व्हायरल करू. माझे सर्व पक्षाशी संबंध आहेत. त्यामुळे आम्हाला मदत करत तात्काळ केसेस परत घेण्याची कारवाई करा. ही गोष्ट पत्नीने सांगितल्यावर आम्ही तातडीने गुन्हा दाखल केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

दुसऱयात दिवशी कडक लॉकडाऊनमध्ये ढिलाई

Patil_p

सोलापूर : युवा चित्रकार विपुलने साकारली रोहित शर्माची पोर्ट्रेट रांगोळी

Archana Banage

पुण्यातील कोरोना : आज 244 नवे कोरोना रूग्ण, 261 डिस्चार्ज

Tousif Mujawar

दौलतनगरात शिवेंद्रराजेंच्या हस्ते मूर्ती प्रतिष्ठापणा

Patil_p

ऑलिम्पिक तिकीट मिळवलेला कुस्तीपटू सुमित मलिक डोप टेस्टमध्ये फेल

Archana Banage

आता यापुढची सारी गणितं सभागृहात, शिवसेनेनं बोलावली तातडीने बैठक

Abhijeet Khandekar