प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव ऑटोमोबाईल मर्चंट असोसिएशन
बेळगाव ऑटोमोबाईल मर्चंट असोसिएशनतर्फे स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. चहावाले नारायण शेट्टी व संतोष शेट्टी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अध्यक्ष शरद पाटील, मंजीतसिंग कोहली, सुरेश पाटील, फिरोजखान, चेतन शहा, कमरूद्दीन, ओमप्रकाश वैष्णवी, सुहास पाटील यासह इतर उपस्थित होते.
महिला आघाडी को ऑप. सोसायटी
महिला आघाडी को-ऑप. सोसायटीतर्फे गणपतगल्ली येथील कार्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. अध्यक्षा माजी उपमहापौर रेणु किल्लेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी दीपा कुडची, मंजुश्री कोले, अर्चना देसाई, कांचन भातकांडे, अनुपमा कोकणे, भाग्यश्री जाधव, अर्चना कावळे, रेखा गोजगेकर, आशा सुपली, दीपा मुतगेकर, कांचन येळ्ळूरकर, सुजाता बांबूळकर यांच्यासह इतर महिला उपस्थित होत्या.
हिंदू राष्ट्र सेनेतर्फे बाईक रॅली
हिंदू राष्ट्र सेना व श्रीराम सेना यांच्यातर्फे मंगळवारी बाईक रॅलीचे आयोजन केले होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून या बाईक रॅलीला सुरूवात झाली. चन्नम्मा चौक, संगोळ्ळी रायण्णा चौक, धर्मवीर संभाजी चौक, कॅम्पमार्गे गोवावेस, बसवेश्वर चौक मार्गे शिवाजी उद्यान येथे बाईक रॅलीची सांगता झाली. हातात तिरंगा घेऊन मोठय़ा संख्येने हिंदू बांधव या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स
गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या पी. जी. विभागातर्फे आझादी का अमृतमहोत्सवानिमित्त लोमॅक्स आश्रम येथे विद्यार्थ्यांना भेट देवून जीवनावश्यक साहित्याचे वितरण केले. साखर, गुळ, बिस्किट, तेलाचा डबा, मिठाई, साबण व इतर आवश्यक साहित्य आश्रमाला देण्यात आले. समन्वयक डॉ. शशिकला जवळकरसह कॉलेजचे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
कंग्राळ गल्ली
कंग्राळ गल्ली येथील जिजाऊ महिला मंडळातर्फे स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला. मंडळाच्या उपाध्यक्षा अनिता शंभूचे यांनी स्वागत केले. माजी महापौर मालोजी अष्टेकर यांच्यासह इतर पंच मंडळींच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. गल्लीतील सैनिक पंकज कोकितकर यांच्या हस्ते भारत मातेच्या फोटोचे पूजन करण्यात आले. बाबूराव कुटे यांनी श्रीफळ वाढविले. वयाची 75 वर्षे पूर्ण करणाऱया मंडळाच्या संस्थापिका अंजना शंभूचे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यानिमित्त आयोजित केलेल्या देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. प्रसाद कंग्राळकर, आकाश सांबरेकर, रोहीत शंभूचे, मनोर बडवाण्णाचे, वीणा उंदरे, लक्ष्मी उसुलकर यांनी यावेळी देणगी दिली.
वाङ्मय चर्चा मंडळ
वाङ्मय चर्चा मंडळातर्फे स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. मंडळाचे स्पर्धाप्रमुख माधव कुंटे यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. याप्रसंगी मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
शनैश्वर मंदिर
पाटील गल्ली येथील श्री शनैश्वर मंदिरातर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृतमहोत्सवानिमित्त ध्वजारोहण केले. त्यानिमित्त पाटील गल्ली येथील मराठी शाळेतील मुलांना जिलेबीचे वाटप करण्यात आले. पुजारी आनंद अध्यापक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानिमित्त रमेश करविनकोप, ज्ञानेश्वर बिर्जे, गुरव व परिसरातील व्यापारी उपस्थित होते. यानिमित्त मंदिरात विशेष पूजेचे आयोजन केले होते.
आगरकर रोड
आगरकर रोड, बेळगाव येथे स्वातंत्र्यदिन साजरा केला. प्रमुख पाहुणे पुसुमल गुलबानी, स्वातंत्र्यसैनिक यांनी राष्ट्रध्वज फडकावला. स्वातंत्र्यावर भाषण, देशभक्तीपर नृत्य व गाणी, रांगोळी स्पर्धा इत्यादी सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात आले. याप्रसंगी अनेक नागरिक उपस्थित होते.
प्राईड सहेलीतर्फे बेळगाव विमानतळ
प्राईड सहेलीच्या सर्व सदस्यांनी विमानतळावर अधिकाऱयांच्या उपस्थितीत ध्वजवंदन केले. कार्यक्रमाची सुरुवात गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करून झाले. त्यानंतर ध्वजवंदनाचा कार्यक्रम करुन मानवंदना दिली. बेळगाव विभागाचे विमानतळ अधिकारी राजेशकुमार मौर्य, सहेलीच्या अध्यक्षा आरती शहा, सुचिता कुलकर्णी आदी मान्यवरांच्या उपस्थित दीपप्रज्वलन करून सांस्कृतिक कार्यक्रम झाला. विमानतळावर उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱयांनी बाईक रॅली काढली होती. यावेळी सहेलीच्यावतीने जिलेबी वाटप करण्यात आले.
पायोनियर बँक
पायोनियर अर्बन बँकेच्यावतीने स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. चेअरमन प्रदीप अष्टेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून हवेत फुगे सोडण्यात आले. तत्पूर्वी विद्यार्थ्यांच्या बँड पथकाद्वारे संचलन करून सर्व संचालक व कर्मचारी बँकेकडे पोहोचले. सर्वांनी हातात तिरंगा घेऊन तिरंग्याला मानवंदना दिली.
बँकेच्या सोईओ अनिता मूल्या यांनी स्वागत केले. यावेळी सर्व संचालक उपस्थित होते.
चव्हाट गल्ली शाळा नंबर 5
चव्हाट गल्ली, येथील मराठी शाळा नं. 5 मध्ये अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दीपक किल्लेकर होते.
प्रतिमापूजन व ध्वजारोहणानंतर व्ही. व्ही. पाटील यांनी प्रास्ताविक केले. शाळेतील विद्यार्थीवर्गाने मराठी, कन्नड, इंग्रजीतून भाषणे केली. यावेळी श्रीकांत कडोलकर, अशोक अष्टेकर, पंडित पावशे, विठ्ठल भट, शाळेचा शिक्षक वृंद, विद्यार्थी वर्ग आणि पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रशांत पोवार यांनी केले. पी. ए. माळी यांनी आभार मानले.
भातकांडे गल्ली ब्रह्मलिंग देवस्थान
भातकांडे गल्ली येथील श्री बह्मलिंग देवस्थानतर्फे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा केला. माजी सैनिक सुनील भातकांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना फळे, फराळ आणि दुधाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पंच मंडळी, नागरिक, महिला, युवक उपस्थित होते.
आराधना शाळा
सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटी संचलित आराधना विशेष मुलांच्या शाळेत अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा केला. इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा शालिनी चौगुले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. ऍड. एम. टी. पाटील यांच्या हस्ते पूजन झाले. या प्रसंगी वासंती आचार्य, मुख्याध्यापक गजानन सुतार, रशीद भाऊ, मारुती कुंभार, नंदा लोहार, किशोर जुवेकर यासह विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन द्वारकाताई पाटील यांनी केले.
अनगोळ श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कमिटी
अनगोळ, नाथ पै नगर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर कमिटी तसेच परिसरातील नागरिकांतर्फे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सीए एन. के. दीक्षित तसेच अनगोळ गावातील सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर लोहार व सुधीर पानारी उपस्थित होते. एन. के. दीक्षित यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी नंदकुमार गौंडाडकर यानी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मनोगत व्यक्त केले. अनगोळ नाथ पै नगर बाबले गल्ली व अनगोळ गावातील नागरिक, महिला व युवक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कृष्णा जठार यांनी सूत्रसंचालन केले. माजी नगरसेवक मोहन भांदुर्गे आभार मानले.
आनंदनगर रहिवासी संघटना
आनंदनगर रहिवासी संघटनेतर्फे अमृतमहोत्सव स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला. आनंदनगर रहिवासी संघटनेचे अध्यक्ष मनोज शिवाजी पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संघटनेचे सदस्य बी. एम. पाखरे यांनी मनोगत व्यक्त केले. संघटनेचे उपाध्यक्ष संतोष पवार, सेपेटरी अमृत मिरजकर यांच्यासह पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते.
कॅपिटल वन
कॅपिटल वनतर्फे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. संस्थेचे चेअरमन शिवाजी हंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर हुतात्मा चौक गणेशोत्सव मंडळाच्या सहकार्याने मिठाई वाटप अशोक पोतदार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित
होते.
लायन्स क्लब
लायन्स क्लब ऑफ बेळगावतर्फे भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करुन ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष काकती आणि अन्य सदस्य उपस्थित होते. सदर कार्यक्रमात इंडियन डेंटल असोसिएशनसुध्दा सहभागी झाली होती.
हिंदू खाटिक समाज
बकरी मंडई, गणाचारी गल्ली, हिंदू खाटिक समाज बेळगावतर्फे स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. अध्यक्ष उदय घोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी मिठाईचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सतीश घोडके, सिंधू काळगे, धनंजय घोडके, सुनील बेळगावकर, राजू कांबळे, सुधीर घोडकेसह समाज बांधव उपस्थित
होते.
नानावाडी शिवशक्ती युवक मंडळ
नानावाडी येथील शिवशक्ती युवक मंडळातर्फे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा केला. माजी सैनिक वसंत गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी विष्णू भुतकी, सागर देमाणे, सुजीत धुमक, अमित गावडे यासह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
कुप्पटगिरी भावकेश्वरी सैनिक संघ
कुप्पटगिरी येथील श्री भावकेश्वरी सैनिक संघातर्फे सोमवारी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ध्वजारोहण केले. यावेळी सैनिक अकॅडमीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कॅप्टन संजीव पाटील, सुभेदार सुनील पाटील, हवालदार प्रताप पाटील, दुद्दाप्पा पाटील, तुकाराम पाटील, भाऊ पाटील यासह आजी, माजी सैनिक, पंच मंडळी उपस्थित होती.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त वडगावात रक्तदान शिबिर
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त वडगाव येथील मल्लिकार्जुन देवस्थान युवक मंडळ व रा. स्व. संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 14 रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये 118 जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यामध्ये 8 महिलांचाही समावेश
होता.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी कुरहुनहट्टी समाजाचे प्रमुख बसवराज अत्तीमरद, श्रीधर तिगडी व नीलकंठ हंचीनमनी उपस्थित होते. रा. स्व. संघाचे नगरसेवाप्रमुख रविनाथ, सहसेवाप्रमुख दिनेश पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.