Tarun Bharat

तालुक्यात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात

Advertisements

तालुका परिसरातील सोसायटय़ांमधून अमृतमहोत्सवी स्वातंत्र्याचा जल्लोष : मान्यवरांकडून ध्वजारोहण, संस्थापक-संचालकांसह कर्मचारी, ग्रामस्थांची उपस्थिती

प्रतिनिधी /येळ्ळूर

बेळगाव तालुका परिसरातील विविध सहकारी सोसायटय़ांमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सोमवारी मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला.

मंगाई मल्टिपर्पज सोसायटी

 मंगाई मल्टिपर्पज सोसायटी-वडगाव यांच्यावतीने ध्वजारोहण करण्यात आले. चेअरमन सतीश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संचालक विनोद चतुर, पी. आर. गोरल, संजय धामणेकर, श्रवणकुमार हेगडे, नारायण काकतकर, शंकर हुवण्णावर, रमेश घाडी, विनोद घाडी, कर्मचारी माधुरी बस्तवाडकर, शीतल शिंगे, नीता कुगजी, चंद्रकांत घाडी, प्रज्ञा पाटील, माया बेळगुंदकर आदी उपस्थित होते.

स्वामी विवेकानंद सोसायटी

येळ्ळूर येथील स्वामी विवेकानंद सोसायटी यांच्यावतीने 75 वा स्वातंत्र्यदिन मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. निवृत्त स्वातंत्र्य सैनिक मारुती कंग्राळकर, दाजिबा पुण्यन्नावर, शिवाजी सुळेभावी आणि यल्लाप्पा धामणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सोसायटीचे चेअरमन प्रकाश पाटील यांनी स्वागत केले. यावेळी उपाध्यक्ष परशराम धामणेकर, संचालक अविनाश पाटील, दीपक चौगुले, प्रदीप पोतदार, महेश देसाई, किरण पाटील, व्यंकटेश पाटील, कृष्णा बिजगरकर, भाऊराव पाटील, वसंत कुगजी, शुभम देसाई, संचालिका रूपाली कुगजी यांच्यासह कर्मचारी व सल्लागार उपस्थित होते.

भाग्योदय महिला मल्टीपर्पज

येथील भाग्योदय महिला मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीमध्ये  अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन संस्थेचे संस्थापक बी. एस. होनगेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी संस्थेच्या चेअरपर्सन दिपाली नवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. व्हाईस चेअरपर्सन सिंधू नारायण चौगुले यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

 यावेळी संचालिका सविता हुक्केरीकर, सुनीता होनगेकर, विद्या देसाई, सविता देसाई, लता पाटील, सरोजिनी देसाई, कविता लाळगे, सुधा पावले, इंदिरा लोहार, रेणुका मोरे उपस्थित होत्या. मॅनेजर उषा लोकनाथ कावळे यांनी स्वागत केले. त्यावेळी सल्लागार अशोक हुक्केरीकर यासह मान्यवर उपस्थित होते.

सह्याद्री आंतरराज्य

काळी आमराई येथील सह्याद्री आंतरराज्य बहुउद्देशीय सरकारी सोसायटीच्या सर्व शाखांमध्ये अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य कार्यालयात सोसायटीचे विद्यमान चेअरमन रघुनाथ बांडगी यांनी ध्वजाचे पूजन केले. ज्येष्ठ सल्लागार ऍड. राजाभाऊ पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. दि. 13 व 14 ऑगस्ट रोजीही मुख्य कार्यालय व सर्व शाखांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी द. म. शि. मंडळाचे सचिव प्रा. विक्रम पाटील, सोसायटीचे व्हा. चेअरमन प्राचार्य आनंद पाटील, संचालक एन. बी. खांडेकर, प्राचार्य एम. बी. निर्मळकर, पी. पी. बेळगावकर, गोपाळराव कातकर, किरण पाटील, विजय भोसले, संचालिका सुजाता मायाण्णाचे, कायदे सल्लागार ऍड. पी. एस. पाटील, ऍड. अनंत पाटील, व्यवस्थापक अनिल कणबरकर, अधिकारी प्रभाकर पाटील यासह  कर्मचारी व पिग्मी संकलक उपस्थित होते.

कंग्राळी बुद्रुक परिसरात

कंग्राळी बुद्रुक, गौंडवाड, यमनापूर, शाहूनगर परिसरामध्ये अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. कंग्राळी बुद्रुक ग्रामस्थांच्यावतीने चव्हाटा सर्कल येथे  ग्रा. पं. महिला सदस्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. निवृत्त जवान अरुण पाटील यांच्या हस्ते ध्वजस्तंभाचे पूजन करण्यात आले. 93 वर्षीय निवृत्त ज्येष्ठ जवान विठ्ठल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ग्रा. पं. कर्मचारी यल्लाप्पा पाटील यांनी सूत्रसंचालन
केले.

श्री कलमेश्वर सोसायटी

श्री कलमेश्वर सोसायटीचे संचालक विजय पावशे, जी. वाय. अष्टेकर, वसंत सुतार, मल्लाप्पा तलवार, सेक्रेटरी अनिल कडोलकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष हुद्दार यांच्या हस्ते फोटोपूजन व ध्वजपूजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष तानाजी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ओमकार सोसायटी

ओमकार सोसायटीमध्ये संचालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. महिला संचालिकांच्या हस्ते फोटोपूजन करण्यात आले. संचालक बबन देसाई यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले. अध्यक्ष गोपाळ पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

माऊली अर्बन सोसायटी

 सर्व संचालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. संचालिका किल्लेकर यांच्या हस्ते फोटोपूजन करण्यात आले. संचालक सिद्राय चव्हाण यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले. अध्यक्ष प्रभाकर पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात
आले.

शिवनेरी कृषी पत्तीन सोसायटी

संचालिका अर्चना पाटील, मालू निलजकर, पेमा कंग्राळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. संचालक नागेश पाटील व नारायण पाटील यांच्या हस्ते फोटोपूजन करण्यात आले. ग्रा. पं. सदस्य जयराम पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. संस्थेचे उपाध्यक्ष देवाप्पा निलजकर यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष दत्ता पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संचालक यल्लाप्पा पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

सांबरा येथील पंढरीनाथ सौहार्द

सांबरा येथील श्री पंढरीनाथ सौहार्द सहकारी सोसायटीच्यावतीने स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. प्रारंभी संचालक अनिल चौगुले यांनी प्रतिमा पूजन केले. चेअरमन यल्लाप्पा हरजी यांनी ध्वजारोहण केले. यावेळी व्हा. चेअरमन संजू गिरीसह सर्व संचालक उपस्थित होते. संचालक महेंद्र गोठे यांनी सूत्रसंचालन केले.

हलगा कृषी पत्तीन सोसायटी

हलगा कृषी पत्तीन सोसायटीमध्ये संचालक उद्राम शिंदे यांनी ध्वजारोहण केले. यानंतर राष्ट्रगीत झाले. यावेळी संचालक, भागधारक, नागरिक उपस्थित होते.

प्राथमिक कृषी पत्तीन संघ कडोलीत

कडोलीत विविध संस्थांच्यावतीने 75 वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्यावतीने ध्वजारोहण चेअरमन इराप्पा शंकर कोले यांच्या हस्ते करण्यात आले. उपाध्यक्ष प्रकाश बाबू राजाई यांच्या हस्ते फोटोपूजन करण्यात आले. यावेळी सर्व संचालक, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

श्रीराम सोसायटी

श्रीराम को-ऑप. पेडिट सोसायटीतील ध्वजारोहण संचालक भरमाण्णा डोंगरे यांच्या हस्ते तर संचालक राजू नरोटी यांच्या हस्ते फोटोपूजन करण्यात आले.

उपतहसीलदार कार्यालय

उचगाव येथील उपतहसीलदार कार्यालयामध्ये स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अनेक अधिकाऱयांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी अटलजी जनसेवा केंद्राच्या अधिकारी, संचालिका गंगुबाई मानकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

महात्मा गांधीजींच्या फोटोचे पूजन व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपतहसीलदार अब्दुल खादरी, असूदे, तलाठी कोष्टी, भारती काकतकर, राजू हिरेमठ यासह या कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी गंगुबाई मानकर यांनी जीवनामध्ये मोठे होण्यासाठी काय केले पाहिजे, याबाबत सविस्तर माहिती दिली.

नवहिंद परिवारतर्फे स्वातंत्र्यदिन साजरा

येथील नवहिंद परिवारतर्फे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. नवहिंद भवन येळ्ळूर येथे सोसायटीचे चेअरमन उदय जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात
आले.

 प्रारंभी बाळू दणकारे यांनी परेड मार्च घेऊन संचलन केले. उदय जाधव यांनी ध्वजारोहण करून मार्गदर्शन केले. यावेळी नवहिंद मल्टिपर्पज सोसायटीचे चेअरमन डी. एन. पाटील, संचालक प्रदीप मुरकुटे, प्रकाश अष्टेकर, सी. बी. पाटील, आनंद मजुकर, पी. एन. कंग्राळकर, एन. एफ. बस्तवाडकर, नितीन कुगजी, वाय. सी. गोरल, वाय. एन. पाटील, पी. एल. पाटील, संतोष अष्टेकर, सुरेश पाटील, नारायण कुंडेकर, दिनेश पाटील, श्रीधर धामणेकर यांच्यासह नवहिंद परिवारातील सर्व सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

उन्नतीतर्फे संक्रांतीनिमित्त विक्री मेळावा

Patil_p

जांबोटी ग्रा.पं.पीडीओंची बदली न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा

Amit Kulkarni

बेळगाव बसस्थानकातून कोकणात धावल्या दोन बस!

Amit Kulkarni

महिला विद्यालय स्कूलचे नृत्य स्पर्धेत यश

Amit Kulkarni

रुंदीकरणानंतरही पांगुळ गल्लीत वाहतुकीची कोंडी

Amit Kulkarni

संकेत पाटील, वैष्णव काकतकर यांचे यश

Amit Kulkarni
error: Content is protected !!