Tarun Bharat

देवेंद्रजी वेशांतर करायचे; अमृता फडणवीसांच्या गौप्यस्फोटाने खळबळ

ऑनलाईन टीम/ तरुण भारत

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसापासून सत्तास्थापनेवरुन अनेक धक्कादायक प्रकार पुढे आले. रोज काही-ना- काही तरी धक्का हा राजकीय नेत्यांबरोबर सर्वसामान्य नागरीकांनाही बसला. फडणवीस आणि शिंदे यांच्या भेटीविषयी एकनाथ शिंदे यांनीच बहुमत चाचणीनंतर केलेल्या दिलखुलास भाषणात खुलासा केला.सत्तांतर काही एका दिवसात झालं नाही. मी आणि देवेंद्र फडणवीस अंधार झाल्यावर भेटायचो असे त्यांनी सांगितलं. दरम्यान अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी सत्तास्थापनेपूर्वीच्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटींविषयी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना माहिती दिली. (Amruta Fadnavis says Devendra Fadnavis Eknath Shinde meeting)

अमृता फडणवीस म्हणाल्या की, राज्यात जी आता शिंदे-भाजप युती झाली ती एका दिवसाची नाही. देवेंद्रजी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी खूप आधिपासून भेटायचे. या भेटीसाठी ते वेशांतर करून जायचे. शिवाय देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, हे देखील आपल्याला आधीच माहित होतं, असंही त्यांनी म्हटलं.

हेही वाचा- कोल्हापूर जिल्ह्यात एनडीआरफच्या दोन तुकड्या दाखल

कालच देवेंद्रजी फडणवीसांनी (Devendra Fadanvis) स्पष्ट केलं की, हे सरकार कोसळणार हे आधीच माहित होत. विरोधीपक्षनेता म्हणून काम करत असताना मविआतील अंर्तगत धुसफुस जाणवू लागली होती. त्यातचं सेनेचा वापर करुन इतर नेते मोठे होत होते हे ही दिसत होते. म्हणूनच आम्ही शिंदे गटाच्या उठावाल साथ दिली असे स्पष्ट केलं. आणि अखेर भाजपने राज्यात एकनाथ शिंदेंच्या मदतीने सरकार स्थापन केलं.

Related Stories

ताज महाल परिसरात फडकवला भगवा; चौघांना अटक

Tousif Mujawar

#INDvsENG सूर्यकुमार तळपला; भारताचा ८ धावांनी विजय

Archana Banage

देशातील सामूहिक चेतना हीच देशाची ऊर्जा

datta jadhav

नाटय़मय चकमकीत एन्काऊंटर

Patil_p

लस येईपर्यंत कोरोनाशी जुळवून घेण्याची गरज : WHO

datta jadhav

कोरोनाच्या धास्तीने एकाची आत्महत्या; आटपाडी तालुक्यातील घटना

Archana Banage