Tarun Bharat

अमूल, मदर डेअरीकडून दूधदरात 2 रुपये वाढ

Advertisements

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपयांनी वाढ केली आहे. नवीन दर बुधवार, 17 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. सुधारित दरांनुसार, अर्धा लिटरच्या अमूल गोल्डची किंमत 31 रुपये आणि अमूल शक्तीची किंमत 28 रुपये असेल. तसेच मदर डेअरीने बुधवारपासून क्रीम्ड दुधाची किंमत 59 रुपये प्रतिलिटरवरून 61 रुपये प्रतिलिटर केली आहे. टोन्ड दुधाची किंमत 51 रुपये झाली असून गायीच्या दुधाचा दर 53 रुपये प्रतिलिटर झाला आहे. यापूर्वी मार्चमध्येही दुधाच्या दरात वाढ करण्यात आली होती.

दुधाची मूळ किंमत आणि उत्पादन खर्च वाढल्याने अमूलने दर वाढल्याचे कारण दिले आहे. गेल्यावषीच्या तुलनेत पशुखाद्याच्या किमतीत सुमारे 20 टक्के वाढ झाली आहे. उत्पादन खर्च आणि पशुखाद्यातील वाढ पाहता अमूल फेडरेशनशी संलग्न असलेल्या दूध संघांनीही शेतकऱयांच्या दूध खरेदी दरात गेल्यावषीच्या तुलनेत 8-9 टक्यांनी वाढ केली आहे. कंपनीच्या धोरणांतर्गत अमूल ग्राहकांकडून मिळणाऱया प्रत्येक 1 रुपयापैकी 80 पैसे दूध उत्पादकांना देते. किमतीत सुधारणा झाल्याने दूध उत्पादकांना मदत होईल आणि त्यांना अधिक दूध उत्पादन करण्यास प्रोत्साहन मिळेल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

1 मार्च रोजी अमूल आणि मदर डेअरी या दोन्ही कंपन्यांनी वाढ केली होती. सध्या अमूल गोल्ड दूध 30 रुपये प्रति अर्धा लिटर, अमूल ताझा 24 रुपये प्रति अर्धा लिटर, अमूल शक्ती 27 रुपये प्रति अर्धा लिटर दराने उपलब्ध आहे.

Related Stories

‘लवासा’प्रकरणी पवार कुटुंबियांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

Patil_p

सोनियांच्या याचिकेवर 17 मार्चला सुनावणी

Patil_p

देशात 12,059 नवे बाधित, 78 मृत्यू

datta jadhav

भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट

Amit Kulkarni

दुबई एक्स्पोत 500 कोटींचा भारतीय पॅव्हेलियन

Patil_p

केरळमध्ये आता निपाहचा धोका

Patil_p
error: Content is protected !!