Tarun Bharat

ऍमी जॅक्शन रिलेशनशिपमध्ये

Advertisements

एड वेस्टविक तिचा प्रियकर

अभिनेत्री ऍमी जॅक्शनने स्वतःच्या रिलेशनशिपची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. तिने इन्स्टाग्रामवर ‘गॉसिप गर्ल’चा अभिनेता एड वेस्टविकसोबतच्या नात्याची अधिकृत घोषणा केली आहे. एडला गॉसिप गर्ल शोमध्ये प्लेबॉय चक बासच्या भूमिकेसाठी ओळखले जाते. याचबरोबर एडने सिटकॉम, व्हाइट गोल्ड या शोंमध्येही काम केले आहे.

एमी ही ब्रिटिश अभिनेत्री असली तरीही तिने 2010 मध्ये दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. त्यानंतर ती ‘एक दीवाना था’, ‘सिंग इज किंग’ आणि ‘फ्रीकी अली’ यासारख्या हिंदी चित्रपटांमधूनही झळकली होती. यापूर्वी ती रजनीकांत यांचा बिग बजेट चित्रपट ‘2.0’मध्ये दिसून आली होती.

एमी यापूर्वी जॉर्ज पानायियोटैसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघांनी 2019 मध्ये एंगेजमेंट केली होती आणि त्यानंतर तिने त्याचवर्षी मुलाला जन्म दिला होता. दोघेही नंतर विभक्त झाले होते.

Related Stories

योद्धा’च्या चित्रिकरणात राशी खन्ना सामील

Patil_p

14 ऑक्टोबरला झळकणार ‘कोड नेम’

Amit Kulkarni

‘इंशाअल्लाह’मध्ये ऋतिक अन् आलिया भट्ट

Amit Kulkarni

‘सत्यमेव जयते 2’मध्ये जॉनचा डबल रोल

Patil_p

वामिका गब्बीकडून चित्रिकरणास प्रारंभ

Patil_p

दीपिकाने इन्स्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुकवरून सर्व पोस्ट केल्या डिलीट

Tousif Mujawar
error: Content is protected !!