अमेरिकेच्या संशोधकांच्या एका पथकाने फ्लोरिडामध्ये आतापर्यंतचा ‘सर्वात मोठा पायथन’ बर्मीज पायथन पकडला आहे. हा 18 फूट लांब आणि 98 किलो वजनाचा अजगर एक मादी असून तिच्या शरीरात 122 अंडी विकसित होण्याच्या स्थितीत आहेत. वैज्ञानिकांना अजगराच्या पोटावत हूफ कोर मिळाले असून यामुळे तिचे अखेरचे भोजन हरिण ठरले असावे असे संकेत मिळाले आहेत.
मादी अजगरच्या नीक्रॉप्सीद्वारे तिच्या पोटात 122 अंडी असल्याचे समोर आले. एखाद्या मादी अजगराच्या पोटात इतकी अंडी आढळून येण्याचा हा विक्रम आहे. मादी अजगराचे वय 20 वर्षे असावे असा अनुमान आहे. तर फ्लोरिडात आतापर्यंतचा सर्वात मोठा नर अजगर 16 फूट आणि 63 किलो वजनाचा आढळून आला होता.
या विशाल अजगराला पकडण्यासाठी संशोधकांनी 20 मिनिटे अथक मेहनत करावी लागली. कन्जरवेन्सीच्या एनव्हार्यन्मेंट सायन्स प्रोजेक्टचे व्यवस्थाक इयान बार्टोस्झेक यांनी आपली संस्था ‘कन्जरवेन्सी ऑफ साउथवेस्ट फ्लोरिडाच्या पायथन प्रोग्राम’ अंतर्गत 2013 पासून अजगरांना हटविण्याचे काम करत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमानुसार मादी अजगरांना या पर्यावरणीय व्यवस्थेतून हटविण्यात येते, जेणेकरून अन्य जीवांना जगण्याची संधी मिळू शकेल. आतापर्यंत सुमारे 1 हजार अजगरांना साउशवेस्टर्स फ्लोरिडाच्या भागातून हटविण्यात आले आहे.