Tarun Bharat

Kolhapur : आरे- सावरवाडी जवळील नदीपात्रात आढळला बेवारस मृतदेह

कसबा बीड/ प्रतिनिधी

आरे- सावरवाडी ( ता करवीर) शुक्रवार दिनांक ३० रोजी नदीपात्रात बेवारस मृतदेह आढळला आहे. या इसमाचे वय ४० ते ४५ च्या दरम्यान असून अंगात पांढरा शर्ट व काळी पॅंट परिधान केलेली आहे. चेहऱ्याचा बराचसा भाग माशांनी खाल्लेला असुन, संपुर्ण बॉडी फुगलेली आहे. त्यामुळे मृतदेह कोणाचा ही ओळख पटवता येत नाही.

आज सकाळी साडे अकराच्या सुमाराला कोणीतरी हे प्रेत पाहुन अरे गावचे पोलीस पाटील विनायक लोहार यांना फोनवरून याची माहिती दिली. ताबडतोब ते घटनास्थळी पोहोचले व खात्री करून त्यांनी करवीर पोलिस स्टेशनला वर्दी दिली. घटनास्थळी करवीरचे पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र पाटील हे सहायक पोलिस कॉन्स्टेबलसह येवून त्यांनी बॉडी नदीपात्रातून बाहेर काढून रितसर पंचनामा केला व पुढील तपासासाठी मृतदेह सी पी आर हॉस्पिटल कोल्हापूर येथे पाटवण्यात आला असून पुढील तपास चालू आहे. 

Related Stories

कोविड सेंटरच्या शाळा चालकांना पालिकेचा ‘झटका’ ?

Archana Banage

इचलकरंजीत अवैध बारवर छापा; 2 मद्यपी युवतींसह 22 जणांना अटक

Archana Banage

तब्बल दहा दिवसांनी ‘या’ चार आगरातून धावली एसटी

Abhijeet Khandekar

सोशल मीडियावर सिनेट निवडणूक प्रचार यंत्रणा सज्ज

Archana Banage

क्रिडाई कोल्हापूरचा स्वदेशीचा नारा!

Archana Banage

कोल्हापूरात पुईखडी नजीक भीषण अपघात; 2 ठार 2 जखमी

Abhijeet Khandekar