Tarun Bharat

उसने पैशाच्या वादातून प्रौढाचा कुऱहाडीने खून

प्रतिनिधी/ गुहागर

उसने दिलेले पैसे परत मागितले म्हणून याचा राग येऊन शेजारी राहणाऱया 48 वर्षीय प्रौढाचा डोक्यात कुऱहाड घालून खून केल्याची घटना गुहागर तालुक्यातील चिखली मांडवकरवाडी येथे घडली. रविवारी पहाटे ही घटना समोर आली. या प्रकरणी गुहागर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

अनंत तानू मांडवकर (48, रा. चिखली मांडवकरवाडी) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मृत अनंत मांडवकर व गुहागर पोलिसांनी ताब्यात घेतलेला सुनील महादेव आग्रे हे दोघे शेजारी रहात असून ते दोघे गेले अनेक वर्ष एकत्र कामालाही जात. त्याच कामांमध्ये दोघांची पैशांच्या व्यवहारांची देवाणघेवाण होत असे. दरम्यान शनिवारी सायंकाळी अनंत मांडवकर याने दारूच्या नशेमध्ये सुनील आग्रे यांच्या घरात जाऊन तुला दिलेले उसने पैसे परत दे, अशी मागणी केली. यावेळी पैशाच्या व्यवहारामध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. अशामध्येच सुनील आग्रे याला राग येऊन त्याने घराजवळ असलेली कुऱहाड घेऊन अनंत मांडवकर याच्या डोक्यात तीनवेळा प्रहार केला. डोक्याला बसलेल्या जोरदार माऱयामुळे मांडवकर जागेवरच खाली कोसळले. रविवारी सकाळी अनंत मांडवकर घरी परत आले नाहीत म्हणून घरच्या मंडळींनी शोधाशोध सुरू केली. यामध्ये मांडवकर हे घराशेजारी मृत स्थितीत आढळल्याने ही घटना उघडकीस आली.

 या घटनेची खबर गुहागर पोलिसांना मिळाल्यावर गुहागर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच पोलिसांनी आजूबाजूचा परिसर तपासण्यास सुरुवात केली. यामध्ये शेजारी राहणाऱया सुनील आग्रेवर संशय आला. गुहागरचे पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते यांनी तातडीने त्याला ताब्यात घेतले. आग्रेजवळ या घटनेचा अधिक तपास करताना त्याने मी रागाच्या भरात डोक्यात कुऱहाड मारल्याचे पोलिसांच्या समक्ष कबूल केले. तसेच डोक्यात मारण्यासाठी वापरलेली कुऱहाडही दाखवली. घटनेची माहिती कळताच एका तासाच्या आतच आरोपीला पुराव्यासह पकडल्याने गुहागर पोलिसांचे कौतुक होत आहे.

Related Stories

कार्यालयाच्या बाथरूमला तीन वर्ष लागत असतील तर इतर कामे काय करणार- आ. नाईक यांनी घेतली सा. बां. ची झाडाझडती

Anuja Kudatarkar

दापोलीत दोघा दुचाकीस्वारांवर बिबटय़ाचा हल्ला

Patil_p

‘वाशिष्ठी’त बुडवल्या वाळूच्या 9 बोटी!

Patil_p

मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रिफायनरी समर्थकांचे 26 ला आंदोलन

Patil_p

कोरोनावर चीनचा ‘त्रीसुत्री फॉर्म्युला’!

NIKHIL_N

जिल्हा क्रिकेट संघात एस.आर.आय अकॅडमीच्या मुलांची निवड

Anuja Kudatarkar