Tarun Bharat

दौडमधून शिवरायांची तत्त्वे रुजविण्याचा प्रयत्न

Advertisements

हिरामणी मुचंडीकर यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी/ बेळगाव

छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, तत्त्वे रुजविण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा उदय झाला. आजचा समाज छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, वीर सावरकर, संगोळ्ळी रायण्णा यांच्या विचारांपासून दूर चालला आहे. हिंदू समाजाला या थोर व्यक्तींची जाणीव शिवप्रति÷ान व संभाजी भिडे गुरुजी दुर्गामाता दौडच्या माध्यमातून करून देत आहेत. रायगडावर 32 मण सुवर्ण सिंहासन पुनर्स्थापित झाल्यास किल्ले रायगडाला एक वेगळी ओळख मिळेल. त्यामुळे प्रत्येकांनी कर्तव्य निधी जमा करावा, असे विचार शिवप्रति÷ानचे धारकरी हिरामणी मुचंडीकर यांनी मांडले.

सहाव्या दिवशीच्या दौडच्या सांगता समारंभात ते बोलत होते. संयुक्त महाराष्ट्र चौक येथे दौडची सांगता झाली. शहराच्या मध्यवर्ती भागात दौड असल्यामुळे प्रत्येक गल्लीमध्ये स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. रात्रभर जागरण करून मोठमोठय़ा रांगोळय़ा तसेच फुलांची सजावट करण्यात आली होती. फुलांच्या पाकळय़ांपासून महिलांनी केलेली सजावट लक्षवेधी ठरत होती. भगव्या पताका, भगवे ध्वज व स्वागत कमानी लावून जल्लोषपूर्ण वातावरणात दौड झाली.

शनिवारच्या दौडला धर्मवीर संभाजी चौकातून सुरुवात झाली. बेळगाव ग्रामीणचे डीसीपी गिरीश व मंजुनाथ यांच्या हस्ते आरती करून ध्वज चढविण्यात आला. शहराच्या मध्यवर्ती भागात दौड असल्यामुळे गल्लोगल्ली नागरिकांचा उत्साह दिसून आला. बसवाण गल्ली, गणपत गल्ली, कडोलकर गल्ली, बुरुड गल्ली, भातकांडे गल्ली, मेणसी गल्ली, आझाद गल्ली, टेंगीनकेरा गल्ली, बापट गल्ली, पांगुळ गल्ली, कामत गल्ली, भडकल गल्ली या भागात दौडचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.

संयुक्त महाराष्ट्र चौक येथील मारुती मंदिरसमोर दुर्गामाता दौडची सांगता झाली. ट्रफिक विभागाचे एसीपी शरणप्पा व खडेबाजार पोलीस स्थानकाचे निरीक्षक दिलीप निंबाळकर यांच्या हस्ते आरती करून ध्वज उतरविण्यात आला. हजारोंच्या संख्येने लहान मुले, युवती, महिला, युवक दौडमध्ये सहभागी झाले होते. भारतीय सैन्यातील जवान सूरज शिंदे व आकाश ताशिलदार यांनी दौडमध्ये सहभाग घेत ध्वज धरण्याचा मान मिळविला.

सोमवार दि. 3 रोजीचा दौडचा मार्ग

काँग्रेस रोड येथील शिवतीर्थ येथून दौडला सुरुवात होणार आहे. ग्लोब टॉकीज रोड, इन्डीपेंडंट रोड, हायस्ट्रीट, चर्चस्ट्रीट, कल्याणी स्वीट मार्ट रोड, गवळी गल्ली, कोर्ट स्ट्रीट, वेस्ट स्ट्रीट, हाय स्ट्रीट कोंडाप्पा स्ट्रीट, चर्च स्ट्रीट, मद्रास स्ट्रीट, कुंतीमाता मंदिर, फिश मार्केट, तेलगु कॉलनी, के. टी. पुजारी, दुर्गामाता मंदिर, खानापूर रोड, धर्मवीर संभाजी चौक, दुर्गामाता मंदिर, जत्तीमठ (धर्मवीर संभाजी चौक) येथे सांगता होईल.   

Related Stories

भगवे ध्वज फडकले अन् त्यांचे पित्त खवळले

Amit Kulkarni

ऑनलाईन शिक्षणासंबंधी लवकरच मार्गसूची होणार जारी

Omkar B

बुक लव्हर्स क्लबच्या कार्यक्रमात ‘महाभारतातील स्त्रिया’ पुस्तकाचा परिचय

Amit Kulkarni

एनसीसी विद्यार्थ्यांच्या ट्रेकचा सांगता समारंभ

Amit Kulkarni

कै. जी. एल. अष्टेकर एक कुशल राजकारणी!

Amit Kulkarni

खासगी शिकवण्या, संगणक वर्ग ‘बेधडक’

Patil_p
error: Content is protected !!