नगरसेवक महेश आमोणकर यांचा दावा : भाजप गट एकसंध
प्रतिनिधी /मडगाव
घनश्याम शिरोडकर यांनी आपण त्यांना मत दिलेले असू शकते असे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आमच्या गटात फूट घ?ालण्याचा प्रयत्न केलेला असला, तरी त्यातून काही साध्य होणार नाही. आमच?ा 15 जणांच?ा भाजप गट एकसंध आहे, असा दाव?ा नगरसेवक महेश आमोणकर यांनी केल?ा ?आहे.
आपण शिरोडकर यांना अर्ज भरताना ?अनुमोदन दिले होते. मात्र आमदार दिगंबर कामत यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर समीकरणे बदलली. आपण शिरोडकर यांन?ा भाजपात येण्यास सांगितले होते, मात्र त्यांनी ऐंकले नाही. आपण भाजपाचा खंदा समर्थक असल्याने भाजप उमेदवाराला मतदान केलेले आहे. घनश्याम शिरोडकर यांनी मी त्यांना मतदान केले असल्याचे भासवून आमच्या गटात फूट घालण्याचे प्रयत्न केलेले असले, तरी त्यातून काहीही साध्य होणार नाही. उलट यातून आमचा गट अधिक मजबूत होईल, असे आमोणकर यांनी सांगितले.
महेश आमोणकर यांच्यावर दबाव टाकून माझ्यावर टीका करण्यास त्यांन?ा सांगितलेले असले, तरी मला आमोणकर यांना काही म्हणायचे नाही. जेव्हा कोणी पुढे येत नव्हते, तेव्हा सर्वप्रथम आमोणकर यांनी माझ्या उमेदवारीला अनुमोदन दिले होते आणि जी पाच अतिरिक्त मते मल??ा मिळ?ाली त्यातील एक मत आमोणकर यांचेच असू शकते, असे घनश्याम शिरोडकर यांनी गुरुवारी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले होते.