राधानगरी / प्रतिनिधी
राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरून धरणाचा 6क्रमाकांचा रविवारी सकाळी 10 वाजून 55 मिनिटाने स्वयंचलित दरवाजा खुला झाला आहे. या वर्षी पाचव्यांदा धरणाचे दरवाजे खुले झाले आहेत. गेल्या 24 तासात 79 मीमी पावसाची नोंद करण्यात आली आहे, तर आजतागायत 3913 मीमी पाऊस नोंदला आहे.
धरणाच्या 6 क्रमांकाच्या दरवाज्यातून 1428 क्यूसेक व खाजगी जलविद्युत केंद्रातून 1600 क्यूसेक असा एकूण 3028 क्यूसेकने विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरू असल्याने नदी काठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.