कोल्हापूर प्रतिनिधी
बर्मिंगहम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत 55 किलो गटात रौप्य पदक जिंकणाऱ्या सांगलीच्य़ा संकेत सरगरला महाराष्ट्र शासनाकडून 30 लाखाचे बक्षिस जाहीर करण्यात आले. यासंबंधिची माहीती मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहे.
बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये रौप्यपदक पटकावण्याची कामगिरी करणाऱ्या सांगली येथील संकेत सरगर या वेटलिफ्टरला सरकारकडून तीस लाखांचे पारितोषिक जाहीर… संकेतसह त्याचे प्रशिक्षकांनाही साडेसात लाखांचे पारितोषिक महाराष्ट्र शासनाकडून जाहीर करण्यात आले. असे या ट्विट मध्ये म्हटले आहे.